लग्नात आलेले १०० हून अधिक वऱ्हाडी मंडळी थेट रुग्णालयात

poisoning from wedding meal in parbhani : परभणी येथील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉलमध्ये हा विवाह समारंभ पार पडला. लग्न झाल्यानंतर लगेच वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले आणि यांनतर वऱ्हाडी मंडळीना विवाह सोहळ्यातून थेट रुग्णालयात जावं लागलं आहे. जे सरुवातीच्या पंगतीला जेवायला बसले त्यांना नंतर पश्चाताप झाला. जेवण झाल्यानंतर काही वेळाने सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होऊ लागली.

poisoning from wedding meal in parbhani
लग्नात आलेले १०० हून अधिक वऱ्हाडी मंडळी थेट रुग्णालयात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं मोठ्या महागात पडलं
  • लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला 
  • सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होऊ लागली

परभणी : लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं मोठ्या महागात पडलं असून  या वऱ्हाडी मंडळीना थेट दवाखान्याचा रस्ता देखील पकडावा लागला आहे. कारण, लग्नात आलेल्या दीडशेहून अधिक वऱ्हाडी (Wedding guests) मंडळींना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. परभणीतील (Parbhani) दर्गा रोड येथे रविवारी (१५ मे) रात्री एक लग्नसोहळा पार पडला. यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे. लग्न लागल्यानंतर भूक लागल्याने अनेक वऱ्हाडी मंडळी पहिल्या पंगतीला जेवण करायला बसले. मात्र, जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

अधिक  वाचा : विमान, ट्रेन, बस किंवा कारमधील सर्वात सुरक्षित सीट कोणत्या?

लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला 

 परभणी येथील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉलमध्ये हा विवाह समारंभ पार पडला. लग्न झाल्यानंतर लगेच वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले आणि यांनतर वऱ्हाडी मंडळीना विवाह सोहळ्यातून थेट रुग्णालयात जावं लागलं आहे. जे सरुवातीच्या पंगतीला जेवायला बसले त्यांना नंतर पश्चाताप झाला. जेवण झाल्यानंतर काही वेळाने सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होऊ लागली. अनेकांना असह्य त्रास झाला. लग्नात खालेल्या अन्नातून विषबाधा झाली असल्याचे लक्षात आल्यावर सर्वाना वेळीच सावधगिरी बाळगत परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आता या वऱ्हाडी मंडळींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

अधिक वाचा : लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हज 

अधिक वाचा : हा खास व्यवसाय सुरू करा 15 हजारात ! 3 महिन्यात कमवा 4 लाख

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी