गुप्तधनात सापडलेला सोन्याच्या नाण्याचा हंडा स्वस्तात विकायचाय? नव्या टोळीचा पर्दाफाश

Police arrested a gang selling secret money cheaply : सापडलेल्या गुप्तधनातील सोन्याची नाणी स्वस्तात विक्री करण्यासाठी ग्राहक शोधणारी गुन्हेगाराची टोळी शिवाजीनगरात मैदानावर थांबल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सायंकाळी चोहोबाजूंनी घेरून संशयितांवर धाड टाकली.

Police arrested a gang selling secret money cheaply
गुप्तधनात सापडलेला सोन्याच्या नाण्याचा हंडा विकायचाय?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुंडलिकनगर पोलिसांनी सापडलेले गुप्तधन स्वस्तात विकणाऱ्या टोळीला शिताफीने अटक केली आहे
  • टोळीतील दोघांवर फसवणूक, दरोडा आणि लुटमारीचे गुन्हे देखील दाखल आहेत
  • धरपकडीत गौतम नावाचा एक संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला

औरंगाबाद : कोण कधी आपली कशाप्रकारे फसवणूक करेल हे सध्याच्या घडीला सांगता येत नाही. दरम्यान, ऑनलाईन फ्रॉड करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नागरिक एका फ्रॉडमधून सजग होत नाहीत तोपर्यंत फ्रॉड करणारे लोकं दुसरा काहीतरी फंडा आजमावतात. औरंगाबादमध्ये असाच काहीसा प्रकार करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला असून, हे गुप्तधन गुपचुप स्वस्तात विक्री करण्याचे आमिष दाखवून लुटमारीच्या उद्देशाने ही टोळी शहरात दाखल झाली होती. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी या टोळीला शिताफीने अटक केली आहे. टोळीतील दोघांवर फसवणूक, दरोडा आणि लुटमारीचे गुन्हे देखील दाखल आहेत. सदर टोळीकडून बनावट सोन्याची २ हजार नाणी, कार, धारदार शस्त्र, मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

अधिक वाचा ; आता काँग्रेस-NCPला बंडाची कीड लागणार; मोठं खिंडार पडणार

धरपकडीत गौतम नावाचा एक संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला

मिळलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या गुप्तधनातील सोन्याची नाणी स्वस्तात विक्री करण्यासाठी ग्राहक शोधणारी गुन्हेगाराची टोळी शिवाजीनगरात मैदानावर थांबल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सायंकाळी चोहोबाजूंनी घेरून संशयितांवर धाड टाकली. यावेळी धरपकडीत गौतम नावाचा एक संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.

अधिक वाचा ; माझ्याकडून झालं मोठं पाप, सेना MP ला 'या' गोष्टीचा पश्चाताप

पोलिसांनी ४ लाख २९ हजार ३९० रुपयांचा ऐवज केला जप्त

दरम्यान, पोलिसांना अशी देखील माहिती मिळाली होती की, गुप्तधनाची विक्री करणारी टोळी दरोडेखोर, फसवणूक करणारी असल्याची समजले होते. त्यानुसार आरोपीवर टाकलेल्या धाडीत १ किलो ७७५ ग्रॅमची बनावट सोन्याची एकूण २ हजार नाणी, धारदार चाकू, चार मोबाईल, रोख रक्कम, कार असा सुमारे ४ लाख २९ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, एसीपी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गांगुर्डे, , मीरा चव्हाण, सहायक उपनिरीक्षक विष्णू मुंढे, रमेश सांगळे, हवालदार बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक काळे, विठ्ठल घोडके, गणेश माने, गणेश डोईफोडे, जालिंदर मांटे, संतोष पारधे, रज्जूसिंग सुलाने, कल्याण निकम यांनी केली आहे.

अधिक वाचा ; धक्कादायक ! वहिनीसह पुतणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

या आरोपींना करण्यात आली अटक?

रवींद्र सुखदेव म्हस्के (रा. हिवरा काबली, ता.जाफ्राबाद, जि. जालना), मंगलसिंग प्रल्हाद पवार, फकिरा शहा सुलेमान शहा (वय ३२), राजेश प्रल्हाद पवार (२४, तिघे रा. पिंपळगाव सराई, जि. बुलडाणा) सुभाष शामराव सुरूसे (४८, रा. मातला, जि. बुलडाणा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या घटनेत एकजण पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी