वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Police arrested a man who threatened to blow up Vaidyanath temple एका गुंडाने बीड (beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर  आरडीएक्स (rdx) लावून उडवून देण्याची धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासात घटनेचा छडा लावत दोघांना अटक केली

Police arrested a man who threatened to blow up Vaidyanath temple
मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पन्नास लाख रुपये द्या; अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू!
  • मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून ५० लाख रुपयांची गरज आहे.
  • पोलिसांनी २४ तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले

Police arrested a man who threatened to blow up Vaidyanath temple बीड / परळी : एका गुंडाने बीड (beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर  आरडीएक्स (rdx) लावून उडवून देण्याची धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासात घटनेचा छडा लावत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांना नांदेड येथून अटक केली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणाला उडवण्याची धमकी आल्याने मात्र, सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. 

पन्नास लाख रुपये द्या; अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू!

पन्नास लाख रुपये द्या; अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू! या आशयाचे पत्र वैद्यनाथ मंदिर संस्थानाला प्राप्त झाल होतं. या पत्रानंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची कथित माफियाच्या धमकी पत्र प्रकरणानंतर वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तर बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली असून श्वान पथकही बोलवण्यात आले आहे. दरम्यान मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी २४ तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही सध्या अधिक चौकशी सुरू आहे. ५० लाख रुपये द्या अन्यथा आर.डी.एक्सने मंदिर उडवून देवू असा मजकूर लिहलेला आहे. त्यावर मोबाईल नंबर व नाव आहे. रतनसिंग रामसिंग दख्खणे अशी धमकी देणाऱ्या गुंडाचे नाव आहे. 

मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून ५० लाख रुपयांची गरज आहे.

 'मी फार मोठा नामी गुंड आहे व ड्रग माफिया असून गावठी पिस्तूल धारक आहे.  मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून ५० लाख रुपयांची गरज आहे. अशा आशयाचे पत्र शुक्रवारी परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना  मिळाले होते. ज्यामधे असं लिहिलं गेलं होत. दरम्यान,  हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, नसता  आपले मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्स उडवून लावेल, अशी धमकीच या गुंडाने दिली. या पत्रामुळे खळबळ उडाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी