बापरे ! खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले, धडावेगळे शीर करून केला होता खून

Police arrested the accused in just 4 hours : आरोपींनी पोलिसांना काही धक्कादायक माहिती दिली. आरोपींनी लक्ष्मण यांना आधी पार्टी देतो म्हणून बोलाविले. त्यानंतर मांजरी शिवारात एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारूही पाजली. त्यानंतर त्यांचा गळा चिरून हत्या केली. अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली

Police arrested the accused in just 4 hours
बापरे ! खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद पोलिसांनी एका मोठ्या खुनाचा उलगडा अवघ्या दोन दिवसातचं केला
  • धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या मृतदेह दोन दिवसांपूर्वी मिळाला होता
  • पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. 

औरंगाबाद :औरंगाबाद पोलिसांनी एका मोठ्या खुनाचा उलगडा अवघ्या दोन दिवसातचं केला आहे. धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या मृतदेह दोन दिवसांपूर्वी मिळाला होता.  गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. हा खून नेमका कोणी केला याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी शिताफीने अवघ्या दोन दिवसताचं गुन्ह्याचा तपास केला आहे. आरोपीने एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपीने मृत्यू व्यक्तीला पार्टी देतो म्हणून बोलावून आधी दारू पाजली त्यानंतर गळा चिरून हत्या केली. या हत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. लक्ष्मण रायभान नाबदे ( वय ५७, वर्षे रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अधिक वाचा : सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी देणार-अजित पवार

पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात एका विहिरीत दोन दिवसांपूर्वी शीर नसलेला मृतदेह तरंगताना काही लोकांन दिसला.  सदर घटनेची माहिती मृतदेह पाहिलेल्या व्यक्तींनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा मृतदेहाला शीर नव्हते, हे पाहून पोलीस देखील चक्रावले. त्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आणि मृतदेहाची ओळख पटवली.  हा मृतदेह लक्ष्मण नाबदे यांचा असल्याचं स्पष्ट झाले. मृतदेहाला मुंडके नसल्याने खुनाचा संशय पोलिसांना अधिक आला त्यानंतर लक्ष्मण यांचा धडावेगळे केलेलं मुंडकं आणि कपडे कायगाव टोका येथे आढळून आले. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने पथक तयार केली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अधिक वाचा ; एकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी

लक्ष्मणला मांजरी शिवारात एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारूही पाजली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिसांना काही धक्कादायक माहिती दिली. आरोपींनी लक्ष्मण यांना आधी पार्टी देतो म्हणून बोलाविले. त्यानंतर मांजरी शिवारात एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारूही पाजली. त्यानंतर त्यांचा गळा चिरून हत्या केली. अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. दरम्यान, खून का केला असा प्रश्न विचारल्यावर आरोपी म्हणाले की, आरोपींपैकी एकाने लक्ष्मण यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र वेळेवर पैसे दिले नाही म्हणून, लक्ष्मण सतत पैशांची मागणी करत होते. तर अनेकदा शिवीगाळ सुद्धा करायचे. म्हणून याचा राग आल्याने आणखी दोन साथीदाराच्या मदतीने लक्ष्मण यांचा आरोपीने खून करण्याचं ठरवलं होत. असंही आरोपींनी पोलिसांना सांगितले.

अधिक वाचा ; SC चा राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यावर 'सर्वोच्च' निर्णय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी