पोलिसांची मोठी कारवाई, डांबून ठेवलेल्या ५० जनावरांची सुटका, कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवल्याचा संशय

Police release 50 captive animals in aurangabad : पोलिसांनी या जनावरांची सुटका करत त्यांची व्यवस्था घायगांव येथील श्री गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ या गोशाळेत करण्यात आली आहे. सदर जनावरांची किंमत प्रत्येकी १३ हजार रुपये असून, यामध्ये काही वासरांचा देखील समावेश होता. या वासराची किंमत ६  हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अंदाजे एकूण ६ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Police release 50 captive animals in aurangabad
पोलिसांची मोठी कारवाई, डांबून ठेवलेल्या ५० जनावरांची सुटका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली
  • औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सदर मोठी कारवाई केली आहे.
  • ५० जनावरांची किंमत प्रत्येकी १३ हजार रुपये असून, वासराची किंमत ६  हजार रुपये

औरंगाबाद : कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सदर मोठी कारवाई केली आहे. सदर जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा आरोपी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तब्बल ५० जनावरांची सुटका केली आहे. सदर घटनेप्रकरणी तीन व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेल्या जनावरांची व्यवस्था गोशाळेत करण्यात आली आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना सुद्धा या जनावरांना कत्तल करण्यासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

अधिक वाचा ; अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा

५० जनावरांची किंमत प्रत्येकी १३ हजार रुपये असून, वासराची किंमत ६  हजार रुपये

पोलिसांनी या जनावरांची सुटका करत त्यांची व्यवस्था घायगांव येथील श्री गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ या गोशाळेत करण्यात आली आहे. सदर जनावरांची किंमत प्रत्येकी १३ हजार रुपये असून, यामध्ये काही वासरांचा देखील समावेश होता. या वासराची किंमत ६  हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अंदाजे एकूण ६ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अधिक वाचा ; 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कसे

मिल्लत नगरमधील तीन वेगवेगळ्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे ठेवले होते डांबून

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना सुद्धा वैजापूरच्या मिल्लत नगरमधील तीन वेगवेगळ्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्राद्वारे मिळाली होती. वैजापूर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी घटनास्थळी पोलिसांना एकूण ५० जनावरे तर एक वासरू आढळून आला. त्यांनतर पोलिसांनी सदर जनावरांना आपल्या ताब्यात घेतले असून, त्यांची व्यवस्था घायगांव येथील श्री गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ या गोशाळेत करण्यात आली आहे.

अधिक वाचा ; पांडूरंगा चरणी अर्पण होणाऱ्या वस्तूंचे असे केले जाते जतन 

या व्यक्तींवर दाखल करण्यात आला गुन्हा

गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना देखील गोवंश जातीचे एकूण ५० जनावरे यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना निर्दयपणे तीन वेगवेगळ्या शेडमध्ये डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीसा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहील सत्तार शेख, नदीम खान, सत्तार कुरैशी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी