यामुळे औरंगाबादेत भाजपच्या जल्लोष रॅलीला पोलिसांनी पाठवलं घरी!

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 06, 2020 | 10:28 IST

Police sent BJP's Jallosh rally in Aurangabad home! भाजपने काढलेल्या जल्लोष रॅलीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान भारतीय जनता पार्टीने काढलेल्या या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होत

Police sent BJP's Jallosh rally in Aurangabad home!
औरंगाबादेत भाजपच्या जल्लोष रॅलीला पोलिसांनी पाठवलं घरी!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शहरात ३ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
  • पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना घरी पाठवलं
  • नागरिकांनी मंदिरातही प्रत्येकी एक दिवा लावावा- विश्व हिंदू परिषद

औरंगाबाद:  संपूर्ण देशभरात काल रामंदिर भूमिपूजनाचा उत्सव (ram janmabhumi bhumi Poojan) मोठ्या आनंदात साजरा होत झाला. रामजन्मभूमी अयोध्यानगरीत (ayodhya nagari) बहुप्रतीक्षित राम मंदिर मंदिराचा भूमिपूजन (ram janmabhumi bhumipujan) सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याच्या दरम्यान अयोध्येपासून देशाच्या कानाकोपऱ्यात रामनामाचा जयघोष सुरु होता. देशातील लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत होते. त्या दरम्यान औरंगाबाद (aurangabad) येथेही भारतीय जनता पार्टीच्या (bjp) वतीने जल्लोष रॅली काढण्यात आली होती. मात्र पोलिसांनी रॅली थांबवत सर्वाना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना घरी पाठवलं

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी औरंगाबाद येथे रॅली काढण्यासाठी मनाई केली होती. मात्र पोलिसांनी (police) केलेल्या मनाईनंतर देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष रॅली काढण्यात आली होती. भाजपने काढलेल्या जल्लोष रॅलीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान भारतीय जनता पार्टीने काढलेल्या या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केली होती. दरम्यान गजानन महाराज मंदिर चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्याना घरी पाठवले आहे. यावेळी काही काळ गोंधळाची देखील परिस्थिती निर्माण झाली होती. 

नागरिकांनी मंदिरातही प्रत्येकी एक दिवा लावावा

रामजन्मभूमी अयोध्या येथे झालेल्या राम मंदिर जन्मभूमी सोहळ्याला कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाता आले नसल्यामुळे, मंदिर, घरी किवा गुरुद्वारावर रोषणाई करत, प्रत्येक नागरिकांनी मंदिरात देखील एक दिवा लावावा, असे आवाहन बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. त्याबरोबरच  श्रीरामाची आरती करून प्रसादाचे वाटप करावा, भगवा झेंडा लावावा.  ‘जय जय श्रीराम’ विजय मंत्राचा घोष करावा. जवळच्या मंदिरात जाऊन शक्य असेल तर आरती करावी. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कही लावावा, असं आवाहन विहिंपचे महानगर अध्यक्ष डॉ. जीवनसिंग राजपूत, महानगर मंत्री शैलेश पत्की यांनी केलं होते.

शहरात ३ हजार पोलीस तैनात

औरंगाबाद शहरात पोलिसांनी काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठी तैयारी करून ठेवली होती. शहरात ३ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करून ठेवला होता. त्याचबरोबर ६० ठिकाणी फिक्स पॉइंट करण्यात आले होते. राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील मागवण्यात आल्या होत्या. शहरातील काही मुख्य चौकात नाकेबंदी देखील लावण्यात आली होती. २ दिवसांपासून सर्वच धार्मिक स्थळावर पोलीस बारीक लक्ष ठेवून होतो. त्याचबरोबर मिश्र वस्तीत अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. 

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिल्या कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना

पिंपरी चिंचवड येथे भाजप आमदारांनी १० लाख लाडू ४० प्रमुख चौकात वाटण्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास देखील  पोलिसांनी आक्षेप घेतला होता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आमदारांची असले असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी