पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पूजाच्या आईचा धक्कादायक खुलासा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 26, 2021 | 18:24 IST

pooja chavan sucide case new twist : आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती असं म्हटलं आहे.

pooja chavan sucide case new twist
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू
  • अरुणला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते.
  • ती आमच्यासाठी मुलासारखीच होती आम्ही सर्व तिला राखी बांधत होतो

बीडः पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात (pooja chavan sucide case) रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर यामध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांचे नाव समोर आले. त्यामुळे सदर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड हा देखील महत्वाचा दुवा असल्याचे मानले जात आहे. मात्र, आता पूजाची आई आणि बहिणीनं एक मोठा गौप्यस्फोट करत म्हटलं आहे की, अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. आम्ही फक्त नावच ऐकलं आहे. बाकी आम्हाला काही माहिती नाही असं पूजा चव्हाणची आई म्हणाली आहे.

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूजाची आई मंडूबाई चव्हाण म्हणाल्या, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असंही मंडूबाई चव्हाण यांनी म्हटलं आहे.  

ती आमच्यासाठी मुलासारखीच होती आम्ही सर्व तिला राखी बांधत होतो

पुढे मंडूबाई चव्हाण म्हणाल्या की, पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तीच फोनवरती बोलणं झाल होतं. बाकी दुसरे तिने आम्हाला काहीच बोलली नाही, असा खुलासाही पूजाच्या आईनं केलाय. पूजा आमच्यासाठी मुलासारखीच होती. आम्ही सर्व तिला राखी बांधत होतो. सर्वांची काळजी घ्या असं ती आम्हाला नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय?, असा सवालही मंडूबाई यांनी उपस्थित केला आहे.

अरुणला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते

दरम्यान पुजाच्या बहिणीने देखील एक खुलासा केला आहे. माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती. माझी बहीण कार्यकर्ती होती हे अख्ख्या बीडला माहीत आहे, ती प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडेंसोबतही फिरलेली आहे. तिचं कोणासोबत नाव जोडणं योग्य नाही, असंही पूजा चव्हाणची बहीण म्हणाली आहे. 

दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता मोठ्या प्रमाणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये अरुण राठोड हा तरुण असल्याचे समोर आले आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील दवाखान्यात झालेल्या गर्भपात प्रकरणात पूजा अरुण राठोड असे नाव समोर आले होते. मात्र, याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी