पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण थंडावणार? वडिलांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 21, 2021 | 16:11 IST

pooja chavan sucide case : पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. आम्हाला जगू द्या, आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही अशी विनंती चंदू चव्हाण यांनी केली आहे.

pooja chavan sucide case
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण थंडावणार?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही – लहू चव्हाण
  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास सुरू
  • विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे

बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (pooja chavan suicide case) राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा जबाबदर धरले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असं वाटल होत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता गुंडाळले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे पूजा चव्हाणचे (Pooja Chavan suicide)  वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणातून माघार घेत असलाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे आता इथेच थांबणार की, पुढे कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही – लहू चव्हाण

पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. आम्हाला जगू द्या, आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही अशी विनंती चंदू चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात तक्रारदारच समोर येत नसल्याने पोलिसांना देखील कारवाई करताना मोठी अडचण होणार आहे. हे मात्र नक्की.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे बाहेर येत आहे. आतापर्यंत सदर प्रकरणात वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड हेच असल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रकरणात विलास चव्हाण या तरुणावर देखील संशय व्यक्त गेला आहे. या प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. मात्र, अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास सुरू

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होत नसल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, आम्ही या प्रकरणाचा तपास सर्वच अँगलने करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून, आवश्यकता असल्यास पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांची देखील चौकशी करण्यात येईल असं स्पष्ट केल आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

पुण्यात केली पूजा चव्हाणने आत्महत्या

पूजा चव्हाणने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. पूजाचे बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पूजा तिच्या चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यात येऊन दोनच आठवडे झाले होते तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी