भाजप खासदराच्या सुनेने पुन्हा साधला रुपाली चाकणकरांशी संपर्क, चाकणकरांच्या ट्वीटने पुन्हा खळबळ

Pooja Tadas contacted Chakankar again :लग्न जरी केले असले तरी ती आतासुद्धा सुरक्षित नाही.वर्धा व नागपूर पोलीसांकडील केस तिला दबावामुळे मागे घ्यावी लागली.हा दबाव वाढून विपरीत घडू नये. पोलिस प्रशासनाने लक्ष द्याव

Pooja Tadas contacted Chakankar again
भाजप खासदराच्या सुनेने पुन्हा साधला रुपाली चाकणकरांशी संपर्क  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पंकज तडस याने अखेर आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं पुजाशी केला विवाह
  • लग्न जरी केले असले तरी पूजा आतासुद्धा सुरक्षित नाही. - रुपाली चाकणकर
  • लग्नानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलं होत.

पुणे : काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सदर व्हिडीओमध्ये तडस यांच्या सून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मदद मागत होत्या. दरम्यान, त्यांनी सदर व्हीडीओत असं म्हटलं होत कि, मी पूजा रुपाली चाकणकर यांना मदत मागते. माझ्या जीवाला इथ धोका आहे. मला विनंती आहे कि इत्थून मला घेऊन चला. सदर व्हिडीओ चाकणकर यांना आल्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर वरती शेअर केला होता. त्यानंतर खासदार तडस यांचा मुलगा पंकज तडस याने अखेर आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं पुजाशी विवाह देखील केला असल्याचं समोर आलं होत. दरम्यान, पंकज तडस याने विवाह करून देखील तडस यांच्या सुन पुजा यांनी माझ्याशी संपर्क साधला, तिच्यावर दबाव टाकून, बळजबरीने लेखी स्वरूपात, माझ्यावर काहीच अन्याय झाला नाही, सर्व चुकीचे होते, असे लिहून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. असं ट्वीट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल आहे. चाकणकर यांच्या ट्वीटनंतर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय केलं आहे रुपाली चाकणकर यांनी ट्वीट?

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन पुजा यांनी माझ्याशी संपर्क साधला,तिच्यावर दबाव टाकून,बळजबरीने लेखी स्वरूपात,माझ्यावर काहीच अन्याय झाला नाही,सर्व चुकीचे होते,असे लिहून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.तिचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क सुद्धा बंद होऊ शकतो.लग्न जरी केले असले तरी ती आतासुद्धा सुरक्षित नाही.वर्धा व नागपूर पोलीसांकडील केस तिला दबावामुळे मागे घ्यावी लागली.हा दबाव वाढून विपरीत घडू नये.संबंधित पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे. असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. 

पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलं होत.

दरम्यान, पूजा आणि पंकज यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलं होत. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलिही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलं होत. मात्र, आज पुन्हा एकदा माझ्या जीवाला धोका असल्याचं पूजा यांनी चाकणकर यांना म्हटलं असल्याचं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी