पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, प्रकरणाला वेगळे वळण

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 14, 2021 | 19:15 IST

Pooja's father's first reaction, a different twist to the matter: मला रात्री २ वाजता फोन आला, आम्ही लगेच गेलो.आम्ही गेलो तेव्हा मयत पडलेली होती. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आमचा कोणावरही संशय नाही असं ते म्हणाले

Pooja's father's first reaction, a different twist to the matter
पूजाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, प्रकरणाला वेगळे वळण  

थोडं पण कामाचं

  • आमचा कोणावरही संशय नाही – पूजाचे वडील
  • पूजा म्हणजे आमचा मुलगा होता
  • गेल्या वेळी २५ लाखाचे नुकसान झाले आहे

बीड : बीड जिल्ह्यातील (beed district) परळी (parali) येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण (pooja chavan) या युवतीने पुण्यात आत्महत्या (suicide) केली असून, या आत्महत्या प्रकरणात राज्याचे मंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांचे नाव समोर आल्याने सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, सदर प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपने देखील या प्रकरणात उडी घेत संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सुरुवातीपासूनचं हे प्रकरण गुंतागुंतीचे होते आणि या प्रकरणात अनेक खुलासे बाहेर येत होते. मात्र, सदर प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पूजा चव्हाणच्या वडिलांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे मांडले आहे.

काय म्हणाले पूजा चव्हाणचे वडील?  

पूजा चव्हाणच्या वडिलांचे नाव लहू चंदू चव्हाण असे आहे. त्यांनी माध्यमांशी केलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले, पूजा जाण्याचे आगोदरच आम्हाला दु:ख आहे. त्यातच “प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या दाखवत आहेत” आणि अशा बातम्या दाखवून ते जास्तच दु:ख देतात. मेन मुद्दा म्हणजे पोल्ट्रीचा आहे. गेल्या वेळी २५ लाखाचे नुकसान झाले आहे आणि आता देखील २० ते २५ लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्या पूजाला स्ट्रेस येऊ शकतो असं पूजाचे वडील म्हणाले. तिला आणखी एक आजार होता त्यामुळेही ती टेन्शनमध्ये असायची. ती लग्नाला देखील आली होती, मी तिला लग्न कधी करायचं विचारत होतो. मात्र, ती नाही पप्पा, मला खूप मोठ बनायचं आहे. मला लग्न आताच करायचं नाही, अशी म्हणायची.  

आमचा कोणावरही संशय नाही – पूजाचे वडील

दरम्यान पुढे बोलताना पूजाचे वडील म्हणाले की, मला रात्री २ वाजता फोन आला, आम्ही लगेच गेलो. आम्ही गेलो तेव्हा मयत पडलेली होती. आम्हाला काहीच सुधरत नव्हत. आमची कोणावरही शंका नाही. काही कोणाला काही दोष द्यायचा नाही. आणि मिडियाच्या माध्यमातून होणारी आमची बदनामी बंद करा, जे सत्य आहे ते बाहेर येईल आम्हाला यामुळे जास्त त्रास होऊ लागला आहे असं देखील पूजाचे वडील म्हणाले.

पूजा म्हणजे आमचा मुलगा होता.

पूजाचे वडील म्हाणाले, त्या सहा बहिणी आहेत. त्यापैकी ती एक भाऊ होता. आतापर्यंत सर्व बहिणी पूजाच्या हातावर राखी बांधायच्या. ती खूप छान होती. खूप धाडसी होती. तिचे काहीतरी बनण्यासाठी खूप प्रयत्न असायचे. परंतु योगायोगाने आमच्या नशिबात असं घडलं. दोन वर्षापासून खूप घाटा होत आहे. सरकारकडून एक रुपयाची मदत मिळाली नाही आणि बँकेचे मॅसेज हफ्ते भरा म्हणून सारखे सुरु असतात. माझा अंदाज आहे की, या स्ट्रेसमुळे पूजाने असं केलं असाव असं पूजाचे वडील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी