स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न पेटला? उस्मानाबादेत गुणरत्न सदावर्तेचे पोस्टर फाडले

Posters of Gunaratna Sadavarta were torn down in Osmanabad ; संवाद परिषदेचे पोस्टर फाडल्यावर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, आज दुपारी 4 वाजता संवाद परिषद होणार असून, शिवसेना किंवा कोणीही विरोध केला तरी तो मोडून काढू रस्त्यावर उतरून लढा देऊ, प्रसंगी न्यायलयीन लढाई लढू असा इशारा रेवण भोसले यांनी दिला आहे.

Posters of Gunaratna Sadavarta were torn down in Osmanabad
उस्मानाबादेत गुणरत्न सदावर्तेचे पोस्टर फाडले, वाद पेटणार?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुणरत्न सदावर्ते यांचे पोस्टर उस्मानाबादमध्ये फाडले
  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह समोरील बॅनर अज्ञातांनी फाडले
  • स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून आज दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार

उस्मानाबाद ; गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पुढाकारातून मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भ स्वतंत्र करण्याच्या मागणीसाठी संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, सदावर्ते यांच्या या मागणीला उस्मानाबादमध्ये चांगलाच विरोध होत असल्याचे पहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह समोरील बॅनर अज्ञातांनी फाडले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा वाद चांगलाच पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.  

अधिक वाचा ; बायका 'हे' काम करत असतील पुरुषांनी लगेच फिरवावेत आपले डोळे

आज दुपारी 4 वाजता संवाद परिषद होणार आहे

संवाद परिषदेचे पोस्टर फाडल्यावर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, आज दुपारी 4 वाजता संवाद परिषद होणार असून, शिवसेना किंवा कोणीही विरोध केला तरी तो मोडून काढू रस्त्यावर उतरून लढा देऊ, प्रसंगी न्यायलयीन लढाई लढू असा इशारा रेवण भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा वाद पेटताना दिसत आहे.

अधिक वाचा ; भारत वि. न्यूझीलंड पहिली वन-डे, कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून आज दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार

दरम्यान, गुणरत्न सदावर्तें यांचे फाडण्यात आलेले बॅनर्स आता घटनास्थळावरून बाजूला करण्यात आले आहेत. दुपारी 4 वाजता या संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून आज दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेने 5 हजार घेऊन हॉल भाड्याने दिला आहे. परिषदच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त देण्याची आयोजकानी लेखी मागणी केली आहे. स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद कार्यक्रमदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद सभागृह दिलेच कसे हा प्रश्न समोर आला आहे. संवाद परिषद कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेतली नाही.

कष्टकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी संवाद परिषद – गुणरत्न सदावर्ते

कष्टकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी उस्मानाबादमध्ये एक मोठी संवाद परिषद आयोजित करण्यात आल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर, भागातील मागसलेपणा संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मिती व्हावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी