ज्ञानाच्या मंदिरात अंधार, मराठवाड्यातील तब्बल 'एवढ्या' शाळांचा वीजपुरवठा खंडित

power supply to 1254 zp schools in marathwada cut off : एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मराठवाड्यातील एक दोन नव्हे तर तब्बल १२५४ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

power supply to 1254 zp schools in marathwada cut off
बापरे ! मराठवाड्यातील एवढ्या शाळांचा वीजपुरवठा खंडित  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तब्बल १२५४ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे
  • ५ हजार २७९ शाळा आहेत. या शाळांकडे एकूण ९.८२ कोटी रुपयांची थकबाकी
  • ३.४७ कोटी रुपयांची रक्कम वसूल करणे बाकी असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला

औरंगाबाद : गेली  २ वर्षापासून राज्यात कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात असल्याने लॉकडाऊन घालून देण्यात आला होता. ज्यामध्ये, राज्यातील मंदिरे आणि शाळा त्यासोबत गर्दी जमणारी सर्व ठिकाणे बंद करण्यात आली होती. परंतु, राज्यातील कोरोनाचे सावट कमी झाले असून,  दुसरी लाट ओसरत असतानाच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शाळा चालू देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मराठवाड्यातील एक दोन नव्हे तर तब्बल १२५४ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, ज्ञानाच्या मंदिरात अंधार असंचं म्हणावं लागेल. 

३.४७ कोटी रुपयांची रक्कम वसूल करणे बाकी असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला

शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळांमध्ये बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात ४८५ शाळा आहेत. त्याचबरोबर , औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद परिमंडळात ४०९ शाळा आहेत. तर हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड झोनमध्ये ३६० शाळांचा समावेश आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५ हजार २७९ शाळा आहेत. या शाळांकडे एकूण ९.८२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर यातील १२५४ शाळांकडे ३.४७ कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल करणे बाकी असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे, शिक्षण विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वय दिसत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात शाळेत वीजेची व्यवस्था नसेल तर विध्यार्थ्यानी शिकायचे कसे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यताही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी