"एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसी करण" प्रदीप साळुंखेंची मागणी

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 10, 2021 | 18:34 IST

Pradip Salunkhe made a unique demand regarding Maratha reservation: किशोर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली असून, याचिकेसाठी मराठवाड्यातून कायदेतज्ञ यांनी सहकार्य करावे - प्रदीप साळुंखे

Pradip Salunkhe made a unique demand regarding Maratha reservation
"एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसी करण" प्रदीप साळुंखेंची मागणी   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला   
  •  निजाम कालीन दस्तऐवज शोधण्यासाठी समिती नेमण्यात यावी - प्रदीप साळुंखे 
  • मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं असल्याचा दावा

बीड : मराठवाडा मराठा आरक्षण (maratha reservation) संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप साळुंखे (pradeep salhunkhe) यांनी "एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसी करण" असा नारा दिला असून, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये (OBC) समावेश करून घ्यावा अशी मागणी केली आहे. प्रदीप साळुंखे यांनी आता मराठवाडा पिंजून काढायला सुरुवात केली असून, मराठवाड्यात (marathawada) मराठा आरक्षण संघर्ष समितीने ठीकठिकाणी बैठका घेण्यास सुरुवात करत जनजागृती मोहीम हाती घेतली घेतल्याचे दिसून येत आहे. साळुंखे यांनी केलेल्या या मागणीमुळे येत्या काळात पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटणार असल्याचं चित्र दिसून येण्याची शक्यता वर्तवली जावू लागली आहे.'ओबीसी हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा निर्धार यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे यांनी बोलून दाखवला आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला   

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून शिक्षण आणि नोकरीतील अनुशेष भरून निघावा, यासाठी छावा मराठा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली असून, याचिकेसाठी मराठवाड्यातून कायदेतज्ञ यांनी सहकार्य करावे,  अशी विनंती देखील प्रदीप साळुंखे यांनी केली आहे. हैदराबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला, मात्र मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला असं देखील साळुंखे म्हणाले. तसंच आरक्षणामुळे मिळालेले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे इतर प्रश्नाकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रदीप सोळुंखे यांनी केली आहे.

 निजाम कालीन दस्तऐवज शोधण्यासाठी समिती नेमण्यात यावी - प्रदीप साळुंखे 

हैदराबाद संस्थानात मराठवाडा सामील झाला. त्यामुळे मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात तेलंगणामध्ये मराठा समाजाला आजही कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण आहे. निजाम कालीन दस्तऐवज शोधण्यासाठी समिती नेमण्यात यावी व पुरावे द्यावेत, असे देखील मागणी प्रदीप सोळुंखे यांनी केली. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ठरवल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. 

मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं असल्याचा दावा

मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं असल्याचा दावा यावेळी सोळुंके यांनी केला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीत समावेश करा या मागणीमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोडफोड आणि रास्ता रोको करून किंवा मोर्चा काढल्याने न्यायालय दखल घेत नाही, त्यामुळे कायदेशीर लढाई करणार असल्याचे देखील प्रदीप साळुंखे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी