औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठीत कीर्तनकार 'बाबाचा पॉर्न व्हिडिओ' व्हायरल, कारवाईची मागणी

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Apr 09, 2022 | 08:39 IST

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यासह राज्यातील वारकरी संप्रदायात (varkari Community) मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे (Shillegaon Police Thane) हद्दीतील एका किर्तनकाराचा 'पॉर्न व्हिडिओ' (Pron video) झाल्याने खळबळ उडाली आहे.

kirtankar  'Baba's porn video' goes viral
ह.भ.प कीर्तनकार बाबाचा बीपीचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी
  • महाराजांचा महिलेसोबत 'शरीरसंबंध' करतानाचा व्हिडीओ व्हायरल
  • महाराजांविरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यासह राज्यातील वारकरी संप्रदायात (varkari Community) मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे (Shillegaon Police Thane) हद्दीतील एका किर्तनकाराचा 'पॉर्न व्हिडिओ' (Pron video) झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किर्तनकार एका महिलेसोबत हे नको त्या अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्या या अवस्थेतील दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा महिलेसोबत 'शरीरसंबंध' करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. 

या किर्तनकार महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्हिडिओमधील दोघेही "आनंद सांप्रदायिक" आहेत. त्याच विचारसरणीला मानणाऱ्या समाजामध्ये किर्तनकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. आनंद सांप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानत आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी