पूजा चव्हाण प्रकरणातील अरुणच्या आईने केला नवा खुलासा, घरात लाखो रुपयाची चोरीही झाली

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 15, 2021 | 18:22 IST

puja chavhan sucide case: अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी मोठा खुलासा करत म्हंटल आहे की, व्हायरल झालेल्या त्या ऑडीओ क्लिपमधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.

puja chavhan sucide case:
पूजा चव्हाण प्रकरणातील अरुणच्या आईने केला नवा खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • धक्कादायक म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी
  • येत्या २५ तारखेला अरुणच्या बहिणीचे होते.
  • बहिनीचे लग्नासाठी तो एक-एक रुपया गोळा करत होता – मीराबाई राठोड

बीड : पूजा चव्हाण (puja chavhan) आत्महत्या प्रकरणात (sucide case) रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येला वेगळे वळण लागताना दिसत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ११ ऑडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या असलल्याचे समोर आले आहे. या ऑडीओ क्लिप्समध्ये ज्या व्यक्तीचा आवाज आहे, तो अरुण राठोड (arun rathod) असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणातील संशयित असलेल्या अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबांसोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. दरम्यान, अरुणच्या आईने एक मोठा खुलासा केला आहे.

अरुणच्या आईने काय केला खुलासा?

अरुण राठोडच्या आईचे नाव मीराबाई राठोड असे आहे. मीराबाई राठोड यांनी सदर प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमुळे अरुणचं नाव सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणच्या घराला कुलूप होतं. त्यामुळे अरुणचे संपूर्ण कुटुंब गायब असल्याच्या चर्चांना उधान आलं होत. मात्र , याविषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी मोठा खुलासा करत म्हंटल आहे की, व्हायरल झालेल्या त्या ऑडीओ क्लिपमधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा त्यांनी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

धक्कादायक म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी

दरम्यान अरुण राठोडच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप होत. घरात कोणीच राहत नव्हत. अरुणचं कुटुंब आज घरी परतल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. अरुणच्या घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.

येत्या २५ तारखेला अरुणच्या बहिणीचे होते.

दरम्यान, येत्या २५ तारखेला अरुण राठोडच्या बहिणीचे लग्न असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बहिणीच्या लग्नासाठी तयारी म्हणून घरात सोने खरेदी केले होते. असा खुलासाही अरूण राठोडच्या आई मीराबाई यांनी केला. ऐन लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच घरात लाखो रुपयांची चोरी झाल्याने राठोड कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे.

बहिनीचे लग्नासाठी तो एक-एक रुपया गोळा करत होता – मीराबाई राठोड

अरुण राठोड हा नगरपालिकेत नौकरी करत होता. त्याची नगरपालिकेतील नोकरी गेली. अरुणची नौकरी गेल्यानंतर तो पुण्याला गेला होता. त्याला बहिनीचे लग्न करायचे होते. त्यामुळे तो बहिणीच्या लग्नासाठी एक-एक रुपया गोळा करत होता. त्याचा यामध्ये काहीच दोष नाही. यामध्ये तो नव्हता, अशी माहिती अरुणची आई मीराबाई राठोड यांनी  दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी