Crime News फटाके फोडण्यावरून वाद; तरुणाची हत्या, चौघेजण गंभीर जखमी

There was a dispute over bursting firecrackers, the youth was killed the next day ; जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात सदर घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सदर घटना मंगळवार २५ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

There was a dispute over bursting firecrackers, the youth was killed the next day
फटाके फोडण्यावरून झाला वाद, दुसऱ्याचं दिवशी तरुणाची हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फटाके फोडण्यावरून झाला होता वाद, त्यानंतर युवकाची करण्यात आली हत्या
  • संजयसिंग टाक असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे
  • संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला होता

जळगाव : दिवाळी हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. या सणात फाटक्याच्या आतिषबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. मात्र, फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात सदर घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सदर घटना मंगळवार २५ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, दोन गटात झालेल्या वादात चार जण जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-२० रा. सिकलकर वाडा, तांबापुरा), असे मृत तरुणाचे नाव आहे. अशी माहिती समोर आली आहे. (quarrel over firing fireworks in jalgaon one person murdered four serious injured)

अधिक वाचा ; मार्कस स्टॉइनिसच्या वादळामुळे पार्थवर श्रीलंका टीम उद्धवस्त

सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून झाला होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री याच परिसरात राहणाऱ्या बावरी भावंडांसोबत संजयसिंग याचा वाद झाला होता. आमच्या घरासमोर फटाके फोडू का फोडले  असं संजयसिंग प्रदीपसिंग टाक  विचारल्याने मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता. यानंतर संजयसिंग प्रदीपसिंग टाक या युवकाची मंगळवारी हत्या करण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा ; मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला

संजयसिंग प्रदीपसिंग टाक याची कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर गप्पा मारत बसला होता. यावेळी मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी अचानकपणे संजयसिंग यांच्यावर  त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. यानंतर संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी हल्ला केला आहे. ज्यामध्ये या हल्ल्यात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक वाचा : भाऊबीजेनिमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज 

घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक

दरम्यान, घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयित फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी