Raj Thackeray : ४ तारखेपासून भोंग्यांचा आवाज ऐकणार नाही, राज ठाकरेंचा पुन्हा अल्टिमेटम

raj thackeray महाराष्ट्र दिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेत लाऊडस्पीकरवर, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर तसेच भाजप मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • महाराष्ट्र दिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे.
 • या सभेत लाऊडस्पीकरवर, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर
 • तसेच भाजप मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : औरंगाबाद : महाराष्ट्र दिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेत लाऊडस्पीकरवर, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर तसेच भाजप मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 • मशिदींवरील भोंगे उतरलेच पाहिजेत, मंदिरावरीलही लाऊडस्पीकर उतरलेच पाहिजेत.
 • अझान देणारे लोक गप्प बसणारे नसतील तर जे कायचे ते होऊन जाऊदे
 • आमच्या सभेवेळी अझान बंद करावी, अन्यथा त्यानंतर काय होईल यासाठी आम्ही जबाबदार नाही.
 • ४ तारखेपासून भोंग्यांचा आवाज ऐकणार नाही, राज ठाकरेंचा पुन्हा अल्टिमेटम
 • रस्त्यावर नमाझ पठण करण्याची परवानगी कोणी दिली?
 • उत्तर प्रदेशमध्ये जर लाऊडस्पीकर उतरू शकतात तर महाराष्ट्रात का नाही?
 • लाऊडस्पीकरचा विषय हा तुम्ही धार्मिक पद्धतीने घेतला तर आम्हालाही धार्मिक पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. 
 • लाऊडस्पीकर हा सामाजिक प्रश्न आहे धार्मिक नव्हे
 • मुस्लिम समाजाने हा मुद्दा समजून घ्यावा.
 • महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत.
 • लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही, यापूर्वी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला.
 • शरद पवार यांनी जातीमध्ये विद्वेष वाढवला. 
 • शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणले. 
 • कुठल्याही जातीची बाजू घेत नाही.
 • शरद पवार यांच्या तोंडून शिवछत्रपतींचे नाव येत नाही.
 • शरद पवार यांना हिंदू शब्दांची ऍलर्जी
 • जातीपातीच्या विषातून आपण दूर राहिले पाहिजे.
 • बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण होते म्हणून शरद पवार यांनी त्यांना त्रास दिला-राज ठाकरे
 • राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण आणि द्वेष वाढला, राज ठाकरे यांच्याकडून पुर्नरुच्चार
 • महाराष्ट्रात नवरात्रौत्सव साजरे करण्याचे श्रेय प्रबोधन ठाकरे यांचे
 • प्रबोधनकार हे धर्म मानणारे होते, ते भट भिक्षूकांच्या विरोधात होते. 
 • शरद पवार यांनी प्रबोधनकारांची सर्व पुस्तकं वाचावीत, ते लेखन व्यक्तिसापेक्ष आहे.
 • सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितले की शरद पवार नास्तिक आहेत. 
 • शरद पवार यांनी जाती जातीत दुही निर्मांण केल्या
 • महाराष्ट्रातले नेते मुद्द्यांवर बोलायचे सोडून गुद्द्यांवर आले आहेत. 
 • महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. 
 • आपण महापुरुषांच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरे करतो.
 • विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा होणार
 • मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात माझ्या सभा होणार- राज ठाकरे
 • मुंबईतल्या सभे नंतर अनेक जण फडफडायला लागले. नंतर ठाण्यात उत्तर सभा घ्यावी लागली
 • राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
 • लवकरच राज ठाकरे यांच्या भाषणाला होणार सुरूवात
 • राज ठाकरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन
 • अयोध्या दौर्‍यावर, भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी