Raosaheb Danave : तरी राज ठाकरे कुणाचेही ऐकणार नाहीत, ते सभा घेतील- रावसाहेब दानवे

१ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. परंतु त्यांना अद्याप सभेसाठी परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांना जर परवानगी नाही मिळाली तरी कुणाचेही ऐकणार नाहीत आणि ते सभा घेतील असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. 

raosaheb danave
रावसाहेब दानवे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. परंतु त्यांना अद्याप सभेसाठी परवानगी मिळालेली नाही.
  • राज ठाकरे यांना जर परवानगी नाही मिळाली तरी कुणाचेही ऐकणार नाहीत
  • आणि ते सभा घेतील असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. 

Raosaheb Danave : औरंगाबाद : १ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. परंतु त्यांना अद्याप सभेसाठी परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांना जर परवानगी नाही मिळाली तरी कुणाचेही ऐकणार नाहीत आणि ते सभा घेतील असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, राज ठाकरे यांची सभा नियमांना धरून असून लोकशाहीने दिलेल्या अधिकार यांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची सभा घेत आहे. पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली तरी राज ठाकरे सभा घेणारच. देशाच्या लोकशाहीने सभांनी आंदोलन घेण्याचा मूलभूत अधिकार दिलेला असून त्या अधिकाऱ्याच्या अनुषंगाने कोणतेही आंदोलन, सभा रद्द करणे हे चुकीचे आहे. राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारची चूक सभेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असून तो त्यांचा अधिकार आहे. हा अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे.असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर ती वरती उत्तर देताना सांगितले आहे.महाराष्ट्रातील पोलीस राज्य शासनाच्या दबावाखाली काम करीत असल्याचे राज्यात दिसून येत असून ही चित्राचा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी