राज ठाकरेंचा राज्य सरकारला अल्टीमेट, मुस्लिम समाजाला नाही -इम्तियाज जलील

औरंगाबाद
भरत जाधव
Updated May 02, 2022 | 09:11 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) नवीन भूमिकेवर राहत राज ठाकरे यांनी औरंगाबादेत (Aurangabad) भोंग्यावर ठाम राहत राज्य सरकारला (State Government) अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या चिथावणीखोर वक्तव्यावर मुस्लमी समाज सावध प्रतिक्रिया देत आहे.

Raj Thackeray's ultimate to the state government-Imtiaz Jalil
राज ठाकरेंच्या अल्टीमेटवर मुस्लिम समाज शांत राहणार - जलील  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी आज जो अल्टीमेटम दिला तो मुस्लिम समाजाला नाही तर महाराष्ट्र सरकारला दिला
  • राज जे बोलत होते ती महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) नवीन भूमिकेवर राहत राज ठाकरे यांनी औरंगाबादेत (Aurangabad) भोंग्यावर ठाम राहत राज्य सरकारला (State Government) अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या चिथावणीखोर वक्तव्यावर मुस्लमी समाज सावध प्रतिक्रिया देत आहे. औरंगाबाद एमआयएमचे खासदार  (MP) इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आज जो अल्टीमेटम दिला तो मुस्लिम समाजाला नाही तर महाराष्ट्र सरकारला दिला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना आव्हान दिले आहे,असे जलील म्हणाले आहेत. 

यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोला देखील लगावला आहे. राज जे बोलत होते ती महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. पुढे जलील म्हणाले, राज ठाकरेंनी ४ मे चा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला. मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्यांच्यासमोर आपण हनुमान चालिसा लावली जाणार. तुम्ही ते लावणार आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करुन घेणार मात्र ते स्वत अयोध्येला जाणार अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली आहे. आज युवा पिढी त्रस्त आहे. रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. हे राज यांनी करायला हवे होते. भाषण ऐकल्यानंतर सियासत कि दुकानो मे जरूरी है मुल्क मेरा जलता है असे मला वाटले असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Also : SpiceJet चं बोईंग B737 विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं

राज भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत

राज ठाकरे भाजपच्या इशारावर चालत आहेत. रिमोट कंट्रोलद्वारे भाजप हे सर्व चालवित आहे. भाजपचेही राज्यात सरकार होते पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. दरम्यान  आज महाराष्ट्रात सर्व सुरळीत आहोत. एक वर्षासाठी आपण कशासाठी भांडत होतो. कोविडविरुद्ध लढत होतो, एक ऑक्सिजन बेड मिळाला तर जग मिळाल्यासारखे वाटत होते. राजनैतिक मतभेद असतील तर ते असु दे पण आजची स्थिती काय हे पाहा आणि बोला.

Read Also : जीएसटी संकलनात महाराष्ट्र एक नंबर, २५ टक्क्यांनी वाढ

मुस्लिम समाज भूमिका घेणार नाही

अल्लाऊद्दीन खिलजीने काय केले हा इतिहास होता, जे चुकीचे झाले ते झाले. आज राज ठाकरे जे ही म्हणाले त्यात मुस्लिम समाज कोणतीही भूमिका घेणार नाही, तो राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रश्न आहे. भोंग्याचा निर्णय न्यायालयातच होत असतो त्याचा निर्णय रस्त्यावर होत नसतो हेही इ्म्तियाज जलील म्हणाले.

राज यांचा इशारा समजला पण... 

राज ठाकरे म्हणाले ''भोंग्याबाबत विनंती करूनही समजत नसतील तर एकदा होऊ द्या'' असे राज म्हणाले हे मला आणि जनतेलाही कळते पण हे सरकारला कळायला हवे. आज राज जे बोलत आहेत तसे आम्हीही बोलू शकतो पण आम्ही बोलणार आहे. मुळात हे सर्व सरकार बघेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी