औरंगाबाद : महाविकासआघाडीत (Maha Vikas Aghadi) सतत खटके उडाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. त्यामुळे आपल्या सर्वाना हा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही तो म्हणजे की महाविकासआघाडीत खरंच आलबेल आहे का? दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेच्या दोन मंत्र्यावर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, शिवसेनेच्या (Shiv Sena) मंत्र्यांकडून सत्तेच्या बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली जात असून, शिवसेना मंत्र्यांच्या अशा वागणुकीवरुन राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) औरंगाबादमधील कार्यक्रमात उघडपणे नाराजी व्यक्त केली. (Rajesh Tope made serious allegations against 2 Shiv Sena ministers)
अधिक वाचा : खिसा खाली करणारी बातमी, लिंबू महागला, धुळ्यात 200 रुपये किलो
दरम्यान, राजेश टोपे यांनी एका कार्यक्रमात बोलताना उघडपणे शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची नावे घेत म्हटलं आहे की, हे दोघेजण आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करत शिवसेनेत घेऊन जात आहेत. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपे यांच्या या नाराजीवर आता शिवसेनेकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर टोपे म्हणाले की, शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. या गोष्टीदेखील खऱ्या आहेत. त्यामुळे या विषयावरुन मी सत्तार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडाफोडी करु नये, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे. दरम्यान, अशा घटना काही पहिल्यांदाच घडताना दिसत नाहीत कारण, याआधी पारनेरच्या सात नरसेवकांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज झाले होते. तर, बीडमध्ये शिवसैनिकांनी उपुमख्यमंत्री अजित पवारांना थेट काळे झेंडे दाखवले होते.
अधिक वाचा : पीएफसाठी वाढू शकते पगाराची मर्यादा, ईपीएफओकडे आला प्रस्ताव