राजेश टोपे थेट भेट घेऊन करणार इंदुरीकरांचे प्रबोधन , मी लस घेतली नाही, घेणार नाही म्हणाले होते इंदुरीकर

Rajesh Tope meet Indurakar Maharaj : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असून लशीबाबत त्यांचे प्रबोधन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Rajesh Tope meet Indurakar Maharaj
राजेश टोपे थेट भेट घेऊन करणार इंदुरीकरांचे प्रबोधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लस घेणार नसल्याचे वक्तव्य केले होते
  • अधिकाधिक लोकांनी कोरोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार
  • सलमान खान हे मोठे सेलिब्रेटी असून ते एका विशिष्ट समाजाचे नाहीत – आरोग्यमंत्री

Rajesh Tope meet Indurakar Maharaj जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असून लशीबाबत त्यांचे प्रबोधन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लस घेणार नसल्याचे वक्तव्य केले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्याचबरोबर राज्यात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे, इंदुरीकर महाराज यांची भेट घेऊन लशीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यांचे प्रबोधन करणार आहेत. इंदुरीकर महाराजांचे आज जालन्यात किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याआधी राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत.

अधिकाधिक लोकांनी कोरोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार

आता इंदुरीकर महाराज जालन्यामध्ये येणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत. अधिकाधिक लोकांनी कोरोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार आहेत. दरम्य, काही दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीबाबत इंदुरीकर महाराज यांनी नकारात्मक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.  

सलमान खान हे मोठे सेलिब्रेटी असून ते एका विशिष्ट समाजाचे नाहीत – आरोग्यमंत्री

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी कोरोना लसीकरणात वाढ व्हावी यासाठी आवाहन करावे असे म्हटले होते. राजेश टोपे यांनी केलेल्या विनंतीनंतर सलमान खान यांनी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध करून लसीकरणासाठी आवाहन केले होते. मात्र, भारतीय जनता पार्टीने या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता. विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण सुरू असल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, यावर टोपे यांनी सलमान खान हे मुस्लिम समाजातून येत असल्याने तुष्टीकरण होत असल्याचा आरोप करणे चुकीचे असून, सलमान खान हे मोठे सेलिब्रेटी असून ते एका विशिष्ट समाजाचे नाहीत. असे स्पष्टीकरण दिले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी