Rajesh Tope On Lockdown : निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील -  राजेश टोपे

Rajesh Tope on corona stituation । जालना :   राज्यात काल 36 हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते. 

  stringent restrictions will have to be imposed
निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील राजेश टोपे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यात काल 36 हजार कोरोना रुग्ण आढळून आले
  • आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत आहोत
  • आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे

Rajesh Tope in Jalna । जालना :   राज्यात काल 36 हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.  (Rajesh Tope On Lockdown If the restrictions are not complied with, more stringent restrictions will have to be imposed )

आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय.

मास्क नसेल तर दंड करा ,गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्याना दिले जातील असंही टोपे म्हणाले.कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही असंही टोपे म्हणाले. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असेही टोपे म्हणाले. मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असही टोपे म्हणाले.

देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून 8 दिवसांत 1 लाख 17 हजार रुग्ण आढळून आले आहे यासाठी गर्दी टाळली पाहिजे तरच संसर्ग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं.चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा लगेचंच प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Also Read : लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्त्वाचे वक्तव्य

अनेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असू न त्या ठिकणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले. धारावीमध्ये 1 हजार रुपयात लस घेतलयाच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, माझ्यात आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं टोपे यांनी मान्य केलं असून चर्चा होत असतात मात्र अंतीम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात असणंही टोपे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव जात असतात त्यांच्याकडे गेलेला प्रस्ताव मान्य झाल्यासच अधिसूचना काढल्या जातात असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून10 तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा या महामारीतून नागरीकांना फकत लस वाचवेल अशी विनवणी देखील त्यांनी केली. लसीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे.असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी