दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या जागी राज्यसभेची पोटनिवडणूक; 'या' नेत्याला कॉंग्रेसने दिली उमेदवारी

Rajyasabha Bypoll Election on rajivराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा एक प्रस्ताव पुढे होत

by election rajyasabha maharashtra
दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या जागी राज्यसभेची पोटनिवडणूक  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • प्रज्ञा सातव, राजीव शुक्ला , मिलिंद देवरा,  या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा होती
  • काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार
  • काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी प्रज्ञा सातव यांची नियुक्ती

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते तथा खासदार राजीव सातव  (Rajeev Satav) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.  सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नेते फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येत होतं. मात्र, आता या जागेसाठी रजनी पाटील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी येत्या दोन ते तीन दिवसांत नावाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, कॉंग्रेसने अगोदरच रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.

दरम्यान, त्यांनाच ही उमेदवारी मिळाली असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांचेही नाव चर्चेत होतं. मात्र, सातव यांच्या जागी रजनी पाटील (rajni patil) यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा  होती. त्यामुळे, प्रज्ञा सातव यांना राजीव सताव यांच्या जागी खासदारकी मिळेल की नाही? अशी शंका  होती.

या नेत्यांच्याही नावाची होती चर्चा?

राज्यसभेच्या जागेसाठी अनेकजण फिल्डिंग लावून होते. ज्यामध्ये मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, राजीव शुक्ला , मिलिंद देवरा,  या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा  वर्तवली जात होती. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.  राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

मुकुल वासनिक यांच्या नावाला विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांचा विरोध

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या नावाला विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याची देखील माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे, पी. चिदंबरम यांना महाराष्ट्रातून राज्यसभा दिल्याने राजीव शुक्ला यांना देण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा एक प्रस्ताव पुढे आला होता.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी प्रज्ञा सातव यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होती. 

४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार

येत्त्या ४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी