अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो म्हणून राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला, जयंत पाटील यांचं विधान

rajyasabha election : Jayant Patil made a big statement " : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रफुल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवन, मुंबई येथे दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते. प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.

rajyasabha election :  Jayant Patil made a big statement
आमचा कोटा पूर्ण होतो म्हणून राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो
  • आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रफुल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला
  • विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही – जयंत पाटील

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भातील आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत माध्यमांसमोर मांडले आहे. “भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला देखील कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला.” असल्याचं मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा : चालत्या गाडीतून रस्त्यावर कोसळले प्रवासी, धक्कादायक व्हिडीओ

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रफुल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रफुल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवन, मुंबई येथे दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते. प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा ; Bad Cholesterol कमी करायचेय? चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ 

विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही – जयंत पाटील

दरम्यान पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्षातील नेते नक्की करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजपा करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल.”, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : या एका चुकीमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता होतेय बेकार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी