उस्मानाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेऊन आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता बंडखोर आणि भाजप मिळून राज्यात सत्तेत येणार असल्याचे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार असून, दरम्यान, राज्याच्या मंत्रीमंडळात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची वर्णी लागणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांची वर्णी लागणार असल्याने उस्मानाबादच्या भाजपात आनंदाचे वातावरण आहे.
अधिक वाचा ; उद्धव ठाकरेंसोबत जे झालं ते भारीचं झालं, MNSची भूमिका
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे. तर , कॅबिनेट मंत्रीपदी चंद्रकांत पाटील , सुधीर मुनगंटीवार , गिरीश महाजन , आशिष शेलार , प्रवीण दरेकर , प्रसाद लाड , रवींद्र चव्हाण , चंद्रशेखर बावनकुळे , विजयकुमार देशमुख , सुभाष देशमुख , गणेश नाईक , राधाकृष्ण विखे पाटील , संभाजी पाटील निलंगेकर , राणाजगजितसिंह पाटील , संजय कुटे , अशोक उईके , विजकुमार गावित, सुरेश खाडे , जयकुमार रावल , अतुल सावे जयकुमार गोरे , रणधीर सावरकर, देवयानी फरांडे , परिणय फुके , विजय कोरे , राम शिंदे या नेत्यांना कॅबिनेट मंत्री पदी संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
अधिक वाचा ; G7 नेत्यांना PM मोदींनी भेट म्हणून दिल्या अनोख्या वस्तू
नितेश राणे , प्रशांत ठाकूर , मदन येरावार , महेश लांडगे , राहुल कुल , गोपीचंद पडळकर , निलय नाईक यांना राज्यमंत्री पद मिळू शकेल अशी शक्यता आहे.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) , गुलाबराव पाटील , दादा भुसे , उदय सामंत , संदीपान भुमरे , शंभूराजे देसाई , दीपक केसरकर , तानाजी सावंत , बच्चू कडू या नेत्यांना मिळू शकते कॅबिनेट मंत्रीपद
संजय शिरसाट , भरत गोगावले , अब्दुल सत्तार , या नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.