औरंगाबाद : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो ही म्हण आता अगदी खरी ठरताना दिसत आहे. कारण, जालना जिल्ह्यतील एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर हे आता एकत्र आले आहेत. अर्जुन खोतकर यांनी आता उध्व ठाकरे यांच्यापासून लांब जात शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांना कायमस्वरूपी साथ देणार असं आश्वासन दिलं होत.
दरम्यान, खोतकर हे आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या शिवसंवाद यात्रेपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत राहिले. आणि अचानक त्यांनी शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काल सकाळी त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडीनंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नाने जुन्या तक्रारी दूर आम्ही एकमेकांनी हातामिळणी केली आहे. तसेच आता सर्व कडू विषय पूर्णपणे संपले असल्याचं म्हणत दानवे आपली भूमिका स्पष्ट केली होती.
अधिक वाचा : "... तर तुमचे लवंडे कसे वागले असते" शेलारांची ठाकरेंवर टीका
दरम्यान, पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, निवडणुकीनंतर पुन्हा भुकंप होत असतात, भुकंपानंतर पुन्हा स्थिर व्हावं लागत. मात्र आता ठरलंय, माझंही ठरलं, खोतकरांचंही ठरलं, अब्दुल सत्तारांचंही ठरलं आणि भुमरेंचंही ठरलं आहे. आम्ही एकत्र आल्याने दुसरा कोणी जालन्यात शिरकाव करूच शकत नाही. त्याचबरोबर आमचं सरकार नसताना जालन्यात २५ वर्षे जिल्हा परिषद ताब्यात ठेवली असंही दानवे म्हणाले. त्याचबरोबर, लोकसभा हा भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. ७ वेळा लोकसभा भाजपने जिंकली, भविष्यातही भाजपच जिंकेल असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : PayTMच्या जागी हे आहे टीम इंडियाचे नवे Title Sponsor
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवे म्हणाले की, मी अर्जुन खोतकरांच्या तोंडात साखर टाकली, खोतकरांनी माझ्या तोंडात साखर टाकली. आणि दोघांना पुष्पगुच्छ देऊन शिंदेंनी स्वागत केलं आहे. आमच्या दोघातील जे कडू विषय होते ते पूर्णपणे संपले आहेत. माझी काल एकनाथ शिंदे आणि खोतकरांशी भेट झाली, काही मतभेद असतील, त्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर, अर्जुन खोतकर आणि माझी आज तब्बल दोन तास चर्चा झाली असंही दानवे म्हणाले.
अधिक वाचा ; Breaking News: CSMT ला लोकलचा एक डब्बा घसरला