उद्धव ठाकरे यांच्या गैरहजरीबद्दल रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी गैरहजर

औरंगाबाद
Updated Dec 24, 2021 | 20:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raosaheb Danve slams CM Uddhav Thackeray : केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी गैरहजर असतात असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.

Raosaheb Danve slams CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी गैरहजर-दानवे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही यात काही नवीन घडतय अस नाही – रावसाहेब दानवे
  • परळी-नगर-बीड या रेल्वे मार्गावरील कामासाठी राज्य सरकारने कालच पैसे दिले - दानवे
  • मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला

Raosaheb Danve slams CM Uddhav Thackeray लातूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाच्या ठिकाणी असलेली अनुपस्थिती, दीर्घ काळ घरातून काम करणे, मर्यादीत जनसंपर्क राखणे या मुद्यांवरुन विरोधक अनेकदा टीका करतात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी गैरहजर असतात असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. लातूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलतेवेळी दानवेंनी हे वक्तव्य केले.

उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाहीत यात काही नवीन घडतय अस नाही – रावसाहेब दानवे

दरम्यान, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठीक असून, ते सभागृहात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहीले नाहीत. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही. यात काही नवीन घडतय अस नाही. कारण, मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. 

परळी-नगर-बीड या रेल्वे मार्गावरील कामासाठी राज्य सरकारने कालच पैसे दिले - दानवे

राज्य सरकारच्या भुमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. परळी-नगर-बीड या रेल्वे मार्गावरील कामासाठी राज्य सरकारने कालच पैसे दिले असल्याचे दानवे म्हणाले. केंद्राचा देखील निधी आहे. त्यामुळे अंतिम मुदतीत ते काम पूर्ण होईल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा चार्ज उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे द्यावा असे विधान केले होते. भाजपचे राज्यातील नेते मुख्यमंत्र्याबाबत विविध विधाने करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर नगरसोल-पुणतांबा या पिठ लाइनचा विषय पण मार्गी लागेल. तसेच लातूरच्या पिठलाइनसाठीही काम प्रस्तावित असल्याची माहिती दानवे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरुन भाजपचे नेते विविध वक्तव्य करत आहेत. राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरुन रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी