Rape of a minor girl : पेन आणण्यासाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबोत घडली धक्कादायक घटना

Rape of a minor girl in Beed district : बीड जिल्ह्यात उसतोड कामगाराच्या १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला.

Rape of a minor girl in Beed district
दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबोत घडली धक्कादायक घटना   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीडित मुलगी नातेवाईकांसोबत गावातील घरीच राहत होती
  • दुकानाच्या मागच्या बाजूला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला आहे
  • बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल

Rape of a minor girl in Beed district बीड : राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याचे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे साकीनाका परिसरात एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली होती. सदर घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटना घडून काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंतच मराठवाड्यातील बीड ( marathawada , beed ) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सदर १३ वर्षीय पिडीत मुलीचे आई – वडील हे उसतोड कामगार आहेत.

पीडित मुलगी नातेवाईकांसोबत गावातील घरीच राहत होती

वडवणी तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन पीडितेचे आई - वडील, ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेले होते. पीडित मुलगी नातेवाईकांसोबत गावातील घरीच राहत होती. मात्र, अभ्यास करत असताना पेन संपला असता ती पेन आणण्यासाठी गेली होती, यावेळी २० वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीडच्या वडवणी तालुक्यात घडली असून वडवणी पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दुकानाच्या मागच्या बाजूला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला आहे

दरम्यान, सदर घटना ही ३० ऑक्टोंबर रोजी घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी ही गावातील किराणा दुकानावर पेन आणण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानावर असलेल्या २० वर्षीय नराधमाने, पीडिता एकटी असल्याची संधी साधून, दुकानाच्या मागच्या बाजूला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी बलात्कार केला आहे. पीडितेचे आई- वडील दुसऱ्या गावाला ऊस तोडणीसाठी गावाला गेले असल्याचं माहिती असल्यामुळे त्याने याचाच फायदा घेत मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती मिळाली आहे.   दरम्यान पिडीतेने घरी आल्यानंतर घडलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या चुलतीला दिली. त्यानंतर तिने पीडितेच्या आई- वडीलांना हा सर्व प्रकार सांगितल्यावर, तिचे आई- वडील देखील गावी आले. 

बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल

दरम्यान सदर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात महिला अन् मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उभा राहिला आहे. याप्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून, गावातील गणेश संदिपान गोंडे या २० वर्षीय नराधम किराणा दुकानदारावर, कलम ३७६ , बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी सदर घटनेची दखल घेत आरोपीला तत्काळ अटक देखील केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी