Rape on minor girl महाराष्ट्र हादरला! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० पेक्षा जास्त नराधमांनी केला बलात्कार

Rape on minor girl in beed अत्याचार पीडित मुलीची आई पीडिता ८ वर्षाची असतानाच वारली आहे. त्यानंतर १३ व्या वर्षी तिचा वडिलांनी बालविवाह करून देण्यात आला होता. मात्र, पतीकडून तिचा छळ होत असल्याने मुलगी पुन्हा वडिलांकडे आली होती.

More than 400 people raped a minor girl
अल्पवयीन मुलीवर ४०० पेक्षा जास्त जणांनी केला बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL

Rape on minor gir:  बीड : राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार काही थांबताना  दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली होती. ही  घटना ताजी असतानाच पुन्हा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यांत एका अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाव तर पोलीस कर्मचाऱ्यानेही या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितलं जात आहे.  अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याचं म्हटलं जात आहे. पीडिता अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून तिचे बालपणीच लग्न झाले होते. 

सहा महिन्यांत शेकडो जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा 

अत्याचार पीडित मुलीची आई पीडिता ८ वर्षाची असतानाच वारली आहे. त्यानंतर १३ व्या वर्षी तिचा वडिलांनी बालविवाह करून देण्यात आला होता. मात्र, पतीकडून तिचा छळ होत असल्याने मुलगी पुन्हा वडिलांकडे आली होती. मात्र, वडिलांकडून तिचा सांभाळ होत नव्हता तर उलट वडिलांकडून तिची छेडछाड होत होती. त्यामुळे तिने जून २०२१ मध्ये मुलीने घरातून पळ काढला होता. त्यानंतर ती अंबाजोगाई बसस्थानकावर राहत होती. आणि भीक मागून आपले पोट भरतं होती. मात्र , जेवणाचे आमिष दाखवून दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई पोलिसांत बालविवाह कायदा आणि बलात्कार करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा नोंद होता.

तक्रार घेऊन ती अनेकवेळा अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गेली, मात्र पोलिसांनीही तिची तक्रार नोंदवून घेतली नाही - पीडिता 

दरम्यान , पीडिताने बालकल्याण समितीला दिलेल्या जवाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने म्हटलं आहे , तिच्यावर चारशेहून अधिक लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने समितीला सांगितले. तक्रार घेऊन ती अनेकवेळा अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गेली, मात्र पोलिसांनीही तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट एका पोलिसानेही तिच्यावर बलात्कार केला असा धकाकदायक खुलासा तिने केला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुलीने बालकल्याण समितीला दिलेल्या जबाबात आपल्यावर सहा महिन्यांत शेकडो जणांनी अत्याचार केल्याचे सांगितले. शिवाय पीडिता गर्भवतीही आहे. त्यामुळे प्रकरण संवेदनशील बनले. 

पुरावे जमा करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनीही अत्याचार केल्याचा दावा मुलीने केला आहे. याचीही सखोल चौकशी केली जाईल. सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करू, असे एस. पी. राजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. सदर घटनेची दखल घेत, पुरावे जमा करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून २ पुरुष व एक महिला अधिकाऱ्याचा यात समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी