नोकरीच्या शोधात नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धक्कादायक माहिती आली समोर, तिघांना बेड्या

rape on nepali minor girl in pune three arrested : पुण्यात रिक्षाचालकाने नेपाळहून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी रिक्षाचालकासह तिघांना याप्रकरणी अटक झाली.

rape on nepali minor girl in pune three arrested
नोकरीच्या शोधात नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुलीला रेसकोर्स जवळील एका सुनसान जागी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला
  • सदर घटना ५  जानेवारी रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे.
  • सदर पिडीत मुलगी देखील २० दिवसांपूर्वी नेपाळहून  भारतात नोकरीच्या शोधात आली होती

rape on nepali minor girl in pune three arrested : पुणे : राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचारच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटना बाढताना पहायला मिळत आहेत.  पुण्यात रिक्षाचालकाने नेपाळहून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या  हडपसर येथील रेसकोर्स परिसरात सदर घटना घडली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते,  याचाच फायदा घेत रिक्षाचालकाने सदर मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

मुलीला रेसकोर्स जवळील एका सुनसान जागी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला

आरोपी रिक्षाचालकाने मुलीकडे पैसे नसल्याने तिला रेसकोर्स जवळील एका सुनसान जागी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. सदर घटना ५  जानेवारी रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपी रिक्षाचालकासह तिघांना याप्रकरणी अटक देखील करण्यात आली आहे.

अशी आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

अशोक विर बहादुर थापा (वय २३) , सागर बिभीषण बचुटे (वय २४), विकी कुमार पासवान (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे असून पीडित मुलीचं वय 16 वर्ष इतकं आहे. 

मुलगी ही नेपाळहून  २० दिवसांपूर्वी भारतात नोकरीच्या शोधात आली होती

पुण्यात राज्यातील अनेक जिल्ह्यातील मुले आणि मुली नौकरीला येतात. त्याचबरोबर विविध देशातील देखील मुली नौकरीच्या शोधात पुण्यात येतात. दरम्यान, सदर पिडीत मुलगी देखील २० दिवसांपूर्वी नेपाळहून  भारतात नोकरीच्या शोधात आली होती. ५ जानेवारीला रात्री ती रिक्षातून तिच्या मैत्रीणीसोबत सागर बचुटे याच्या रिक्षातून प्रवास करत असताना त्या दोघींकडे पैसे नसल्याचा फायदा घेत आरोपी सागरने त्याच्या मित्रांसोबत मिळून तिचा बलात्कार केला असल्याची धक्काददायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर घटना घडत असताना तिची मैत्रीण मात्र, यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान त्यानंतर पीडित मुलीबरोबर तिच्या मैत्रीणीने  हडपसर पोलिसांत जाऊन तक्रार केली. या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी