राऊतांचे ते ट्विट अन् खोतकरांच्या त्या व्यथेला, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर म्हणाले, कारवाईला घाबरून शिंदे गटात येऊ नका

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Jul 31, 2022 | 15:08 IST

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार (MP) आणि धडाडीचे नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पत्रा चाळ (Patra Chaal Scam) घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून (ED) संजय राऊत यांच्या घरात तपास सुरू आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकाऱ्यांना त्यांच्या घरावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली आहे. या कारवाईवर काँग्रेसने (Congress) संजय राऊत यांना पाठिंबा दिला तर भाजपच्या (BJP) नेत्यांनी आणि शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांच्या अटकेची शक्यता वर्तवली.

Don't join the Shinde group in fear of ED's action- CM's appeal
ईडीच्या कारवाईला घाबरून शिंदे गटात येऊ नका- CM चं आवाहन  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ईडीच्या कारवाईवर काँग्रेसने संजय राऊत यांना पाठिंबा दिला
  • कर नाही तर डर कशाला असली पाहिजे- मुख्यमंत्री
  • संजय राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाईचा निषेध केला आहे.

CM on Sanjay Raut ED Inquiry :  शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार (MP) आणि धडाडीचे नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पत्रा चाळ (Patra Chaal Scam) घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून (ED) संजय राऊत यांच्या घरात तपास सुरू आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकाऱ्यांना त्यांच्या घरावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली आहे. या कारवाईवर काँग्रेसने (Congress) संजय राऊत यांना पाठिंबा दिला तर भाजपच्या (BJP) नेत्यांनी आणि शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांच्या अटकेची शक्यता वर्तवली. सर्वत्र या कारवाईची चर्चा असताना औरंगाबाद(संभाजीनगर) च्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांना टोलाही लगावला.

संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे, चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही हे मी सांगू शकत नाही, कर नाही तर डर कशाला असली पाहिजे, आता ईडी चौकशीतून पुढे काय समोर येईल ते कळेच, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. चौकशी होऊ द्या. राऊतांनीच सांगितलंय, मी काही केलं नाही.

मग कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊ द्या. त्यातून सत्य पुढे येईलच, ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. रोज सकाळी 9 वाजता ते बोलत होते. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. दरम्यान आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असताना शिवसेने खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. हे ट्विट खूप चर्चेत आहे. 

Read Also : 15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवावा- PM Modi चं आवाहन

ईडी कारवाईवर संजय राऊतांच ट्वीट

संजय राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाईचा निषेध केला आहे. “मी शिवसेना सोडणार नाही. ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.” असे ट्वीट राऊतांनी केले आहे. 

Read Also : खासदार संजय राऊतांना सोमय्यांनी संबोधलं माफिया

अर्जुन खोतकरांची व्यथा 

ईडीची कारवाई फक्त पक्ष फोडण्यासाठी किंवा आमदारांना घाबरविण्यासाठी केली जाते, असा काही रोख राऊतांच्या ट्विटचा होता. तसाच रोख हा काल अर्जुन खोतकरांचा होता. आपल्यावरील आर्थिक संकटाचं कारण त्यांनी पुढे करत आपण सहारा शोधत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. राजकारण बाहेर होतं, पण घरी आल्यावर कुटुंब दिसतं… अडचणीतला माणूस आधार शोधत असतो. मीसुद्धा तो शोधलाय. माझ्यावर आणि कुटुंबावर ताण आहे. यातून तुम्ही काय समजायचं ते समजून घ्या. असा वारंवार सूचक इशारा दिल्यानंतर अखेर जालन्याचे शिवेसना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देतोय, असं खोतकरांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांच उत्तर 

संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,  त्यांना कोणी बोलवलं नाहीये. विशेष म्हणजे ईडीच्या कारवाईच्या भीतीने कुणीही येऊ नका, शिवसेनेकडेही येऊ नका भाजपकडेही येऊ नका, आम्हाला दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही असं जाहीर आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. केंद्रीय तपास यंत्रणांनी यापूर्वी ज्या कारवाई केल्या आहेत त्या सूडाने केल्या असत्या किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती, तर न्यायालयाने लगेच संबंधित व्यक्तींना दिलासा दिला असता. 

Read Also : वेटलिफ्टिंगमध्ये बिंदयाराणी देवीने पटकावलं रौप्य पदक

आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं, इतक्या मोठ्या घडामोडी झाल्या, त्यात एकतरी सूडाची कारवाई झाली का,  असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. जितके आमदार किंवा खासदार आमच्याकडे आले त्यांनी एकाने तरी सांगितलं का आम्हाला ईडीची कारवाई आली म्हणून आम्ही आलो असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर सरकार टीकेले आणि कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी