जालना : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात सत्तार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. सत्तार यांनी आपल्या विरोधात होत असलेला वाढता विरोध पाहून माफी देखील मागितली होती. दरम्यान, आता जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांना मतिमंदांच्या शाळेत भरती करा असा खोचक सल्ला कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.
अधिक वाचा ; लहान मुलांमध्ये अशी ओळखा डेंग्यूची लक्षणे...लगेच करा उपचार
दरम्यान, सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच यासंदर्भात वक्तव्य केलं होत. नेत्यांनी कसं बोलावं, यासंदर्भात प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं. त्यावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, अब्दुल सत्तार यांना मतिमंद शाळेत भरती करा किंवा त्यांना शिकवण्यासाठी एखादा मतिमंद शिक्षक नियुक्त करा असंही कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट
पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं की, "मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं होत.
अधिक वाचा ; इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वीजबिल भरा घरबसल्या, पाहा कसे
औरंगाबाद येथे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.