नांदेड : जवळपास अडीच महिन्यांपूर्वी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्या झाली हेती. या हत्येचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या केली होती. बियाणी यांच्या हत्येने नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी सदर हत्येप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अधिक वाचा : IPLमध्ये १ ही सामना न खेळता दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला खेळाडू
दरम्यान, संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी SIT गठीत केली होती. तर या SIT चे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे जबाबदारी होती. अखेर या हत्याप्रकरणाचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अधिक वाचा : BF सोबत लग्न करण्यासाठी बांगलादेशातून पोहत भारतात आली तरूणी
संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा लवकर होत नसल्याने नसल्यानं बियाणी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी बियाणी कुटुंबियांनी आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे केली होती. मात्र, संजय बियाणी हत्येप्रकरणी अडीच महिने तपासाची चक्रे फिरवत SIT प्रमुख विजय काबाडे यांच्या पथकानं पंजाबमधून एक तर सहा आरोपी नांदेडमधून ताब्यात घेतले आहेत.
अधिक वाचा : Vastu Shastra:या दिशेला घड्याळ लावल्याने चमकणार तुमचे नशीब
पोलिसांनी एकूण ७ आरोपींना जरी ताब्यात घेतले असले तरी अद्याप संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे या घटनेतील उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील दोन मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. हे दोन आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बियाणी हत्याकांडातील संशयित हरियाणाच्या आरोपींवर तब्बल १३ खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तर उत्तर प्रेदशातील आरोपींवर सहा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. गोळीबारानंतर बियाणी हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेत बियाणी यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड शहरातील गीता नगर परिसरात बियाणी हे आपली गाडी घरासमोर लावत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियानी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या होत्या.