प्रताप सरनाईकांनी तब्बल 75 तोळे सोनं तुळजाभवानी मातेला केलं अर्पण

Saranaik offered 75 tolas of gold to Tuljabhavani Mata ; सरनाईक यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मुलांच्या लग्नात केलेला नवस म्हणून सोनं अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. यात कोणताही राजकीय नवस किंवा ईडीचा दिलासा असा विषय नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी नवसपूर्ती म्हणून तब्बल 75 तोळे सोने अर्पण केले.

Saranaik offered 75 tolas of gold to Tuljabhavani Mata
सरनाईकांनी 75 तोळे सोनं तुळजाभवानी मातेला केलं अर्पण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
  • सरनाईक यांनी नवसपूर्ती म्हणून तब्बल 75 तोळे सोने अर्पण केले
  • शिंदे गटात मी आलोय, भाजपमध्ये आलोय म्हणून माझी संकटं दूर झाली असं नाही – प्रताप सरनाईक

उस्मानाबाद: शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी एक दोन नव्हे तर चक्क 75 तोळे सोने तुळजाभवानी मातेला अर्पण केले आहे. प्रताप सरनाईक हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यामुळे सरनाईक चांगलेच अडचणीत आले आहेत. शिंदे गटाने बंड करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतरही सरनाईक यांची डोकेदुखी थांबलेली नाही. असं असलं तरी सरनाईक यांचे सार्वजनिक कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यान, त्यांनी 75 तोळे सोने तुळजाभवानी मातेला अर्पण केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अधिक वाचा ; 'या' गावात 6 वाजता वाजतो सायरन आणि टीव्ही, मोबाईल होतात बंद

नवसपूर्ती म्हणून तब्बल 75 तोळे सोने अर्पण केले

सरनाईक यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मुलांच्या लग्नात केलेला नवस म्हणून सोनं अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. यात कोणताही राजकीय नवस किंवा ईडीचा दिलासा असा विषय नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी नवसपूर्ती म्हणून तब्बल 75 तोळे सोने अर्पण केले. देवीच्या चरणी त्यांनी 51 तोळे सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत. मी देवीला साकडं घातलं होतं. माझ्या मुलाचं आणि सुनेचं चांगलं व्हावं. त्यासाठी मी तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देण्याचं गाऱ्हाणं घातलं होतं. त्यामुळेचं मी आज इथं आलो असून, देवीला सोने अर्पण केले असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, त्वचा होईल चमकदार 

नेमकं सरनाईक यांनी काय नवस मागितला होता?

सरनाईक यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, मुला सुनांवर लक्ष ठेव, त्यांचं व्यवस्थित होऊ दे, असं साकडं देवीला घातलं होतं. त्या दोघांचं चांगलं झालं. त्यांचं लग्न सुरळीत पार पडलं. नातवंडही झाले. तो नवस फेडण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणाले. मागे ईडीचं एक संकट होतं. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

शिंदे गटात मी आलोय. भाजपमध्ये आलोय म्हणून माझी संकटं दूर झाली असं नाही – प्रताप सरनाईक

शिंदे गटात मी आलोय. भाजपमध्ये आलोय म्हणून माझी संकटं दूर झाली असं नाही, असं त्यांनी सांगितलं. जी प्रकरणं न्यायालयात असतात, कुठलाही राजकीय पक्ष किंवा कोणताही नेता त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायालयीन लढाई लढावीच लागते.  सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात केसेस सुरू आहेत. न्यायालयीन लढाई लढत आहे. असं काही असतं तर मधल्या काळात आमची संपत्ती जप्त केली. ती झालीच नसती. युतीतील आमदार आहोत म्हणून मला सोडलं नाही असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी