Minor Raped : धक्कादायक ! नांदेडमध्ये स्कूल बस चालकाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर केला बलात्कार, तणावातून पिडीतेने केलं 'असं' काही

School bus driver rapes 15-year-old girl : नवनीत शिकणाऱ्या मुलीला स्कूलबस चाकालाने अनेक दिवसांपासून फूस लावली होती. सदर पिडीत मुलीला फूस लावून स्कूलबस चालकाने तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेनंतर आरोपी गजानन वडजे हा पिडीत मुलीला ब्लॅकमेल करू आणि लागला. आणि ब्लॅकमेल करून त्याने पुन्हा अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. तुझे आता लग्न होऊ देणार नाही अशी धमकी आरोपी गजानन वडजे याने अनेकवेळा पिडीत मुलीला दिली

School bus driver rapes 15-year-old girl
स्कूल बस चालकाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्कूल बस चालकाने एका नवनीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला
  • नांदेड शहरात घडली अत्याचाराची घटना
  • तणावातून पीडित मुलीने फिनेल प्राषण करुन आत्महत्येचा केला प्रयत्न

नांदेड : राज्यात काहींही झालेले तरी महिला आणि लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण काह्ही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूल बस चालकाने एका नवनीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला आहे. सदर अत्याचाराची घटना नांदेड शहरात घडली आहे. १५ वर्षीय नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या स्कूलबस चालकाचे नाव गजानन वडजे असं आहे.

अधिक वाचा : समुद्रात मासेमाराला सापडला ‘एलियन प्राणी’समुद्रात मासेमाराला

या तणावातून पीडित मुलीने फिनेल प्राषण करुन आत्महत्येचा केला प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत शिकणाऱ्या मुलीला स्कूलबस चाकालाने अनेक दिवसांपासून फूस लावली होती. सदर पिडीत मुलीला फूस लावून स्कूलबस चालकाने तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेनंतर आरोपी गजानन वडजे हा पिडीत मुलीला ब्लॅकमेल करू आणि लागला. आणि ब्लॅकमेल करून त्याने पुन्हा अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. तुझे आता लग्न होऊ देणार नाही अशी धमकी आरोपी गजानन वडजे याने अनेकवेळा पिडीत मुलीला दिली. त्यामुळे पिडीत मुलगी चांगलीच घाबरली होती. दरम्यान, वाहनचालक सतत देत असलेल्या तणावातू पीडित मुलीने फिनेल प्राषण करुन आत्महत्येचा देखील करण्याचा  प्रयत्न केला होता. अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरे मोठे नेते, वेळ आल्यावर गैरसमज दूर करू : केसरकर 

पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सदर पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचाचार सुरू आहेत.उपचारादरम्यान पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. यावेळी आपल्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला असल्याचं माहित झाल्यावर मुलीच्या वडिलाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या वडिलांनी मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि  पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन वडजे याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली असून, पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत.

अधिक वाचा : महाराष्ट्रातील राजकारणातील रंजक नाट्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी