Rajesh Tope : उद्यापासून शाळा सुरू होणार,कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे, त्यामुळे शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच मुलांमध्ये हलकी लक्षणं आढळल्यासही चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. 

rajesh tope
राजेश टोपे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे
  • शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी
  • एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो वर्ग बंद ठेवावा

Rajesh Tope : जालना : उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे, त्यामुळे शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच मुलांमध्ये हलकी लक्षणं आढळल्यासही चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅटफॉर्मने एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना टोपे म्हणाले की,  पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं. लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील. असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात लस घेणं सक्तीचं नाही मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणं त्यांना भाग पाडू असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्बेत स्थिर असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी