बीड : बीड शहरातील एका सराफ व्यापाऱ्याला १९ वर्षीय तरुण नोकरावर विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. सदर नोकराने मालकाला तीन लाख २५ हजार रुपयाचा चुना लावला असून, त्याचबरोबर मालकाची बुलेट देखील नोकाराने घेऊन पळ काढला आहे. करण मुंडे असं मालकाला गंडवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश मैड असं सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. आपण ज्या मुलावर विश्वास ठेवला त्याच मुलाने आपल्याला लाखो रुपयाचा चुनाव लावून पळ काढला असं लक्षात आल्यानंतर मालक गणेश मैड यांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. ज्या नोकरावर विश्वास ठेवला त्यानेच हे कृत्यू केल्याने त्यांना मोठा धक्कादेखील गणेश मैड यांना बसला आहे.
अधिक वाचा ; शिंदे गट जिल्हाप्रमुख आणि पोलिसात वाद,जिल्हाप्रमुखांचा आरोप
करण मुंडे हा १९ वर्षाचा आहे. तो लहान असल्याने त्याला कामावर कसे ठेवायचे आणि त्याला काय काम द्यायचे असा प्रश्न देखील गणेश मैड यांना पडला होता. मात्र, मैड यांच्या मित्राने हा गरजू असल्याचे मैड यांना सांगितले त्यामुळे त्याच्या परिस्थितीकडे पाहून गणेश मैड यांनी त्याला आपल्या सोन्याच्या दुकानात कामावर ठेवलं होत. मैड यांचे दुकान बीड शहरातील सुभाष रोडवर कैलास ज्वेलर्स या नावाने आहे. त्याचबरोबर गणेश मैड यांची एक ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल नावाची एक संस्था आहे. करण मुंडे याने पळवलेली रक्कम याच संस्थेची असल्याचं गणेश मैड यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा : आम्ही सुनावणी काय टाळली, तुम्ही सरकार स्थापन केले : SC
गणेश मैड यांनी सांगितल्याप्रमाणे, गणेश मैड यांच्या संस्थेतील रक्कम ही या दुकानात आणली जात होती. हे पैसे स्वतः गणेश मैड हे बँकेत जमा करायचे. मात्र, काल हातात काम असल्यामुळे करण मुंडे नावाच्या कामावर ठेवलेल्या मुलाला त्यांनी स्वतःची बुलेट देत तीन लाख पंचवीस हजार रुपये एवढी रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली होती. मात्र, करण मुंडे याने ही रक्कम बँकेत न भरता बुलेटसह लंपास केली आहे.
अधिक वाचा : उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापलं
दरम्यान, गणेश मैड यांना करणने रक्कम भरण्यासाठी गेल्यानंतर एकदा फोन देखील केला होता. त्याने मालकाला फोन करत म्हटलं होत की, बँकेचा लंच टाईम संपला नाही अजून वेळ लागेल वापस येऊ का? मात्र गणेश मैड यांनी त्याला तिथेच थांब असं म्हटलं. यानंतर न तास उलटून गेल्यानंतरही दुकानात परत आला नाही. त्याचा फोन देखील बंद लागत होता. गणेश यांनी बँकेत फोन करून विचारणा केली असता त्या ठिकाणी करण मुंडे याने पैसे जमा केले नसल्याचे बँकेतील कर्मचारी यांनी सांगितलं. गणेश यांनी तत्काळ करण याच्या गावाकडे धाव घेतली असता गणेशच्या आई-वडिलांकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी आई-वडिलांनी सरळ हात वर केले. हा प्रकार बघून मालकाची शुद्धच हरपली.
गणेश मैड यांनी कामावर ठेवलेल्या करण मुंडे या मुलाने आपले पैसे आणि बुलेट घेऊन फरार झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. आरोपी करण मुंडेवर पोलिसांनी संध्याकाळी गुन्हा दाखल करून आरोपी करणचा तपास सुरू केला आहे.