Raju Shetty :राजु शेट्टी यांच्याकडून शरद पवार यांची पाठराखण, तर ऊसाच्या पीकावरील वक्तव्याचा घेतला समाचार

Sharad Pawar is not a racist or a religious person : प्रत्येक घरात देवघर आहे. तिथे तासंतास पूजा करावी. मात्र त्याचे प्रदर्शन करण्याची किंवा जबरदस्ती करण्याची गरज नाही. असंही शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, 'धर्माबाहेर जाऊन सामान्यांचे प्रश्न मांडा' प्रत्येक जण आपला धर्म पाळतो. ही सहज भारतीय प्रवृत्ती आहे. त्याचे प्रदर्शन करायची गरज नाही.

Sharad Pawar is not a racist or a religious person
राजू शेट्टी यांनी केली शरद पवारांची पाठराखण, म्हणाले पवार...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वाभिमानी  शेतकरीसंघटनेच्या हुंकार यात्रेला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात
  • राजू शेट्टी यांनी केली शरद पवार यांची पाठराखण
  • शरद पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत - राजू शेट्टी

उस्मानाबाद : स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) हुंकार यात्रेला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काम करत असून, साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस हे आळशी लोकांचं पिक आहे, असं केलेल्या वक्तव्यावर राजू शेट्टी म्हणाले की, 'आळशी लोकांचे पीक' असं पवार म्हणालेचं कसे? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. आजपर्यंत शेतीचं सगळ्यात जास्त ज्ञान पवार साहेबांना आहे, असं वाटत होतं. मात्र ते कुठेतरी आता चुकीचं वाटत आहे. एकमेव ऊस पीक आहे, ज्याला बंधनकारक हमीभाव आहे. तशाच प्रकारचा हमी भाव इतर पिकांना मिळाला असता तर निश्चितच शेतकरी त्याकडे वळाला असता, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; या जन्मतारखेची लोक जन्मतः नशीबवान असतात, वाचा सविस्तर

जाती धर्माच्या बाहेर जाऊन जे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतील त्याला समर्थन – राजू शेट्टी

राज्यात चाललेल्या घडामोडींवर बोलताना राज्य शेट्टी म्हणाले की, जाती धर्माच्या बाहेर जाऊन जे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतील त्याला समर्थन आहे. वीज , पेट्रोल डिझेल गॅस महागाई याकडे लक्ष द्या , यावर चर्च हवी, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टू यांनी दिली. प्रत्येक घरात देवघर आहे. तिथे तासंतास पूजा करावी. मात्र त्याचे प्रदर्शन करण्याची किंवा जबरदस्ती करण्याची गरज नाही. असंही शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, 'धर्माबाहेर जाऊन सामान्यांचे प्रश्न मांडा' प्रत्येक जण आपला धर्म पाळतो. ही सहज भारतीय प्रवृत्ती आहे. त्याचे प्रदर्शन करायची गरज नाही.

अधिक वाचा ; सोन्याच्या तेजीला लागला ब्रेक, उच्चांकीवर घसरला सोन्याचा भाव 

८०० शेतकऱ्यांचा बळी ज्यांनी घेतला त्याच्या भाजप सोबत जाणार नाही  - शेट्टी

२० वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष व काम करतोय , निवडणुका दुय्यम मुद्दा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे ते मांडत राहणार. महाविकास आघाडीशी ५ एप्रिल रोजी संबंध तोडले आता पुन्हा ते जोडले जाणार नाही. असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, ८०० शेतकऱ्यांचा बळी ज्यांनी घेतला त्याच्या भाजप सोबत यापुढे जाणार नाही.

अधिक वाचा : Chromeचा उपयोग तुम्ही करताय मग गुगलचा इशारा एकदा वाचा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी