पुलवामा हल्ल्यासारखीच घटना निवडणुकीआधी राज्यातली स्थिती बदलू शकते, शरद पवारांचं वक्तव्य

औरंगाबाद
Updated Sep 21, 2019 | 14:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)अध्यक्ष शरद पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यात भाजप सरकारविरोधात खूप नाराजी आहे आणि पुलवामासारखीच घटना निवडणुकीच्या आधी स्थिती बदलू शकते.

Sharad pawar ncp
पुलवामा हल्ल्यासारखीच घटना निवडणुकीआधी राज्यातली स्थिती बदलू शकते, शरद पवारांचं वक्तव्य  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी नेत्यांचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
  • काही दिवसांपूर्वी पाकिस्तानबद्दल आगळंवेगळं वक्तव्य करणारे एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
  • राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये नाराजी आहे आणि पुन्हा पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातही सत्तांतर अटळ आहे. 

औरंगाबादः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी नेत्यांचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानबद्दल आगळंवेगळं वक्तव्य करणारे एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगाबादमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये नाराजी आहे आणि पुन्हा पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातही सत्तांतर अटळ आहे. 

पवारांनी यावेळी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राग आणि दुःख अशी परिस्थिती होती. मात्र सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा हल्ला झाला आणि त्यानंतर संपूर्ण परिस्थिती बदलली. आता लोकांचं मन केवळ पुलवामा हल्ल्यासारख्या परिस्थितीमुळेच आता लोकांचे मन बदलू शकते.  शरद पवार यांनी दावा केला की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्याविषयी विचारपूस केली असता, तो 'जाणीवपूर्वक' केल्याचा त्यांना संशय आला.

एवढंच बोलून पवार थांबले नाहीत तर त्यांनी पुढे म्हटलं की, मी संरक्षण क्षेत्रात काम केलं आहे. जेव्हा मी काही अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा मला शंका होती की हा हल्ला मुद्दाम घडवण्यात आला आहे किंवा त्यामागं पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. याचवर्षी 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारनं पाकिस्तानमधल्या बालाकोट स्थित एका दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले होते, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. 

पवार म्हणाले की, बालाकोट हवाई हल्ल्यांमुळे मोदी सरकारची लोकप्रियता वाढली. दरम्यान ते म्हणाले की, मोदींची लोकप्रियता महाराष्ट्रात चालणार नाही कारण लोक फडणवीस सरकारवर समाधानी नाहीत.  राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान होईल. राष्ट्रवादीकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. फडणवीस यांनी पुन्हा सत्तेत यावं असं कोणतंही काम महाराष्ट्र सरकारनं केलेलं नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...