शिंदे सरकारची औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती, नव्याने निर्णय होणार

Shinde government postpones Aurangabad, Osmanabad name change : शिंदे सरकारने राज्यपालांना बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने सरकार कोसळणार असल्याचे लक्षात येताच औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दी बा पाटील असं नामांतर करण्याचा ठराव शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर केला होता.

Shinde government postpones Aurangabad, Osmanabad name change
शिंदे सरकारची औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली
  • धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली
  • तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार

उस्मानाबाद : ठाकरे सरकार (Thackeray Government)  कोसळल्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायालादेखील  शिंदे सरकारने (Shinde Govenment) स्थगिती दिली आहे. यामुळे हा उद्धव ठाकरे यांना जबर झटका मनाला जात आहे.

अधिक वाचा : पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतवा 50 रुपये आणि मिळवा 50 लाख

धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली

शिंदे सरकारने राज्यपालांना बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने सरकार कोसळणार असल्याचे लक्षात येताच औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दी बा पाटील असं नामांतर करण्याचा ठराव शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर केला होता. मात्र, राज्यात शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करत आहे.

अधिक वाचा ; आज राज्यात कशी असेल पावसाची स्थिती, हे आहेत सध्याचे अपडेट्स

तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार

सरकारने राज्यपालांना बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा : आज मुंबईत 11 वाजता मोठी घडामोड, फडणवीस पोहोचणार शिवतीर्थावर 

सरकार कोसळण्यापूर्वी २९ जून रोजी नामांतराच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत आपाल वेगळा गट तयार केला होता. यानंतर शिंदे यांनी सरकार स्थापनेचा दावा देखील केला होता. यानंतर सरकार कोसळण्यापूर्वी २९ जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. या बैठकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात देखील उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी