'दुसरा कोणी असतं तर मी रट्टे द्यायला लावले असते', शिंदे गटाचे आमदार बांगरांची कर्मचाऱ्यांना धमकी

Shinde Group MLA Bangar threatens mahavitaran employees ; आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याच कारण देखील तसचं आहे. बांगर यांनी पुन्हा महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • आमदार संतोष बांगर यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्याला धमकावले
  • बांगर हे अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल
  • थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापल्याने बांगर भडकले

हिंगोली :  शिंदे गटाचे हिंगोली जिल्ह्यतील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे सतत कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वीच आमदार बांगर यांनी एक अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने जोरदार चर्चेत आले होते. दरम्यान, आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याच कारण देखील तसचं आहे. बांगर यांनी पुन्हा महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिली आहे. बांगर हे अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अधिक वाचा ; व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा

थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापल्याने बांगर भडकले

सध्या संतोष बांगर यांच्या व्हिडीओची मोठी चर्चा सुरु आहे. या व्हिडीओत बांगर हे एका अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचे दिसून येत आहेत. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला. त्यांनी कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कळमनुरी मतदार संघात बांगर यांची आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानाखाली लावल्याने यावर जोरदार राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

थकीत बिलामुळे लाईन तोडण्यासाठी तगादा लावत असल्याचे प्रकरण बांगरांकडे आले होते

महावितरणचे कर्मचारी हे शेतकऱ्यांची थकीत बिलामुळे लाईन तोडत आहेत. त्यामुळे, शेतकरी हे आमदार बांगर यांच्याकडे आले होते. त्यानंतर आमदार बांगर यांनी संबधित कर्मचाऱ्यांना फोन लावला आणि त्याला थेट रट्टे देण्याची भाषा केली. बांगर कर्मचाऱ्याला बोलत असताना त्या ठिकाणच्या एकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे.

अधिक वाचा ; गिल,धवन,अय्यरची तुफानी खेळी, न्यूझीलंडला हव्यात इतक्या धावा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी