बुलढाणा : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) देखील आक्रमक झाले असल्याचे पहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांना कुठे पाठवायचं तिकडे पाठवा, राज्यपालांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये वाद निर्माण होईल. ज्या राज्यपालांना आपल्या राज्याचा इतिहास माहिती नाही, ज्यांना राज्य काय आहे ते कळतं नाही अशा राज्यपालांना आपल्या राज्याच्या राज्यपाल पदावर ठेऊ नये. असं म्हटलं आहे. पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे की, भगतसिंग कोश्यारी यांच्याऐवजी मराठी मातीतील माणूस राज्यपाल पदी ठेवा. अशी मागणी देखील शिंदे गटातील गायकवाड यांनी केली आहे.
अधिक वाचा ; दत्ता ऐवजी नाव कुत्ता होताच अधिकाऱ्यासमोर लागला भुंकायला
राज्यभरात अनेक ठिकाणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी राज्यपालांच्या पोस्टरला जोडो मारून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या विधानाचा निषेध केला जात आहे. राजकीय स्तरातून देखील राज्यपालांवर टीका केली जात आहे.
अधिक वाचा ; दत्ता ऐवजी नाव कुत्ता होताच अधिकाऱ्यासमोर लागला भुंकायला
दरम्यान, राज्यपाल यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही जेव्हा शिकत होतो, तेव्हा आम्हाला विचारलं जात होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सांगायचो की, सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो पहायला मिळतील, ‘शिवाजी तर जुने झाले आहे’. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला, यावेळी राज्यपाल यांनी हे विधान केलं आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते.
अधिक वाचा ; आजचा सोमवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य