औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट यांनी म्हटलं की, औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकाकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी अहमद मुस्ताक यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाजीनगर नावाला विरोध होत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. त्याचबरोबर, आता उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : हे 3 लिंबू पेय किडनीसाठी आहेत फायदेशीर, किडनी होईल स्वच्छ
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझा थेट प्रश्न आहे की, राष्ट्रवादीने संभाजीनगरला विरोध केला असून, तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा. तर संभाजी महाराजांचे नाव या शहराला नको का? असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता यात काही राष्ट्रवादीच्या लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही हीच राष्ट्रवादी आहे ज्यांच्यामुळे आम्ही उठाव करण्याचा निर्णय घेतला होता. असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. संभाजीनगरचा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळाचा विषय असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेलं ते नाव आहे असंही आमदार शिरसाट म्हणाले.
अधिक वाचा मुलांना कार, बाईक चालवायला दिली तर जबरदस्त शिक्षा, पाहा नियम
सदर प्रकरणात शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. मी जयंत पाटील यांची भेट घेऊन, राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याला आवर घाला म्हणून मागणी करणार असल्याचं खैरे म्हणाले. उच्च न्यायालयात याचिका करणारा हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी, यापूर्वी देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती अशीही आठवण खैरे यांनी करून दिली आहे.
अधिक वाचा : ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने....