Arvind Sawant : खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक..

शिवसेना उध्दव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन गटात सध्या जोरदार विरोध होताना दिसून येत आहे

Shiv Sainiks of Shinde group aggressive against MP Arvind Sawant in Beed
अरविंद सावंत यांच्या विरोधात बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करावे का?या वक्तव्यावरून शिंदे गट आक्रमक 
  • खासदार अरविंद सावंत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा ताफा फोडू ..
  • शिवसेना उध्दव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन गटात सध्या जोरदार विरोध होताना दिसून येत आहे

सुकेशनी नाईकवाडे(बीड): - शिवसेना उध्दव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन गटात सध्या जोरदार विरोध होताना दिसून येत आहे आपसातील मत भेद अन कोणाचे किती मोठे वर्चस्व या नादात ठाकरे गट अन शिंदे गट यातील नेते अन कार्यकर्ते एकमेकांना खाली उतर बोलण्याची एक ही संधी सोडत नसल्याचे सबंध महाराष्ट्र पहात आहे.
या परिस्थितीत कोण कोणाला किती पातळी सोडून बोलत आहे याचे मात्र भान हरवल्याचे ही पाहवयास मिळत आहे. (Shiv Sainiks of Shinde group aggressive against MP Arvind Sawant in Beed)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत..  उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळयाचे बीड मध्ये दहन करण्यात आले असून खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी तत्काळ माफी मागावी अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही त्यांचा ताफा फोडू असा इशारा बीडजिल्हा शिंदे गटाचे  शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे.

beed

यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे  यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर खासदार अरविंद सावंत  यांना चांगलाच इशारा ही दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी