एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी शिंपडले गोमुत्र, पहा व्हिडीओ

Shiv Sainiks sprinkled cow urine on the road where Eknath Shinde went : एकनाथ शिंदे आज पैठण येथे जाहीर सभा देखील घेणार आहेत. दरम्यान, शिंदे हे औरंगाबादमध्ये ज्या रस्त्याने आले होते. त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडले आहे. शिंदे ज्या  रस्त्याने गेल्याने रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

Shiv Sainiks sprinkled cow urine on the road where Eknath Shinde went
एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी शिंपडले गोमुत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिंदे आलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी शिंपडले गोमुत्र
  • शिंदे ज्या  रस्त्याने गेल्याने रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसैनिकांनी शिंपडले गोमुत्र
  • शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे आज औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे आज पैठण येथे जाहीर सभा देखील घेणार आहेत. दरम्यान, शिंदे हे औरंगाबादमध्ये ज्या रस्त्याने आले होते. त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडले आहे. शिंदे ज्या  रस्त्याने गेल्याने रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

अधिक वाचा : VIDEO: रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना अचानक आली ट्रेन आणि...

शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले

दरम्यान, औरंगाबादमधील बिडकीन येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं असून, शिवासैनिकानी शिंदे गेलेल्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडल्यानंतर यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने – सामने आल्यानंतर दोन्हीकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अधिक वाचा : 'या' 3 राशींसाठी 23 ऑक्टोबरपर्यंत आहे शुभ काळ, होणार धनलाभ

शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडले आहे

गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. शिंदे हे शिवसेनेत असताना ते शिवसेनेत महत्वाचे नेते होते. मात्र, बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिक शिंदे यांना गद्दार देखील म्हणू लागले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमधील पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु, त्यांच्या सभेआधीच ते ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडले असल्याचा प्रकास घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून गेले आहेत, त्या रस्त्याचं आम्ही गौमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे असं शिवसैनिक म्हणाले आहेत.

अधिक वाचा : इतका फॅन की कोहली या क्रिकेटरला भेटायला गेला सकाळी ५ वाजता 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ज्याठिकाणी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती तेथेच हा प्रकार झालाय

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट तयार केला आणि भाजपसोबत जात मुख्यमंत्री झाले. परंतु, शिंदे यांची ही बंडखोरी शिवसैनिकांना आवडलेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावर चांगलाच राग आहे. याचाच प्रत्येय आज शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून दिला आहे. सदर घटना ही आदित्य ठाकरे यांची औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी सभा झाली होती त्याचं ठिकाणी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोमुत्र गोमूत्र शिंपडणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी