Tanaji Sawant : 'तानाजी सावंत गद्दार',म्हणत शिवसैनिकांनी फोडले तानाजी सावंतांचे उस्मानाबादमधील कार्यालय

Shiv Sainiks vandalized Tanaji Sawant's office in Osmanabad : सावंत यांचे कार्यालय फोडल्यावर शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे

Shiv Sainiks vandalized Tanaji Sawant's office in Osmanabad
'तानाजी सावंत गद्दार',म्हणत शिवसैनिकांनी फोडले सावंतांचे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आता तानाजी सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालय देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले
  • काही वेळांपूर्वी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुणे येथील कार्यालय शिवसेनेच्या वतीने फोडण्यात आले होते
  • शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली – शिवसैनिक

Tanaji Sawant : पुणे : काही वेळांपूर्वी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुणे येथील कार्यालय शिवसेनेच्या वतीने फोडण्यात आले होते. यानंतर आता तानाजी सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालय देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर कार्यालयाच्या शटरवरती गद्दार खेकडा असं देखील लिहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत अनेक आमदारांना आपल्या सोबत घेऊन गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे शिवसेनेचे आमदार गेले आहेत त्याच्या कार्यालयाची तोडफोड आता शिवसेनेने सुरु केली आहे. भूम – परंडा –वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड देखील शिवसेनेन केली आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात असणाऱ्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत तोडफोड केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान देखील झाले आहेत.  

अधिक वाचा : बंडखोर आमदारांच्या आरोपांना सणसणीत उत्तर देणारा VIDEO

शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली शिवसैनिक

दरम्यान, सावंत यांचे कार्यालय फोडल्यावर शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.

अधिक वाचा : आमदारांच्या कुटुंबाची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी नाही 

शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल शिवसैनिक

दरम्यान, पुढे बोलताना शिवसैनिक म्हणाले की, शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यलयाला धडा दिला. असं शिवसैनिक म्हणाले.

अधिक वाचा : लिव्हर खराब होण्याची ही आहेत प्रमुख लक्षणे, वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी