या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय, म्हणत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

Shiv Sena agitation started in Aurangabad : शिवसेनेने औरंगाबादच्या क्रांती चौक येथे प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी बंडात सामील असलेल्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात घोषणाबाजी देखील केली. 'उद्धव ठाकरे साहब आगे बडो, हम तुम्हारे साथ है', शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय, उद्धव साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, आशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

Shiv Sena agitation started in Aurangabad
या गद्दरांचे करायचं काय म्हणत शिवसेनेचे जोरदार आंदोलन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कालपासून शिंदे यांची वरिष्ठ नेते समजूत काढत असल्याचं पहायला मिळत आहे.
  • राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ संभ्रमाचे वातावरण आहे.
  • औरंगाबादच्या क्रांती चौकात सुद्धा शिवसैनिक मोठ्याप्रमाणावर जमा झाले असून आंदोलनाला सुरवात झाली

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सध्या गुवाहटी येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे असचं म्हणावं लागेल. शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेना मात्र, मोठ्या अडचणीत सापडली आहे. दरम्यान, कालपासून शिंदे यांची वरिष्ठ नेते समजूत काढत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, शिंदे कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. याचवेळी राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ संभ्रमाचे वातावरण आहे. आज शिवसेनेकडून बंडाच्या विरोधात निदर्शने करून, शक्तिप्रदर्शन करण्याचा देखील आता शिवासैननिक प्रयत्न करत आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौकात सुद्धा शिवसैनिक मोठ्याप्रमाणावर जमा झाले असून आंदोलनाला सुरवात झाली आहे. तर 'या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणा देखील शिवसैनिकांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा : १४ महिन्यातच १ लाख रूपयांचे झाले ३९ लाख रूपये, वाचा सविस्तर

शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय - देण्यात आल्या घोषणा

शिवसेनेने औरंगाबादच्या क्रांती चौक येथे प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी बंडात सामील असलेल्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात घोषणाबाजी देखील केली. 'उद्धव ठाकरे साहब आगे बडो, हम तुम्हारे साथ है', शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय, उद्धव साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, आशा घोषणा देण्यात आल्या आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचा सहभाग पाहायला मिळाला. तसेच 'आम्ही शिवसेनेसोबत' अशा आशयाचे होर्डिग पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळाले आहे.

अधिक वाचा : विश्वकप विजेता खेळाडू चक्क पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा 

जनता आजही शिवसेनेच्या सोबत आहे – आमदार अंबादास दानवे

आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. गेलेली लोकं आजही आमचे सहकारीच आहे. त्यामुळे त्यांनी परत यावे. नेते गेले असली तरीही कार्यकर्ते अजूनही शिवसेनेतच आहे, असेही दानवे म्हणाले. बाहेर गेलेल्या लोकांनी आजची ही गर्दी बघावी. जनता आजही शिवसेनेच्या सोबत आहे. स्थानिक शिवसैनिकांमध्ये मोठा रोष आहे. असही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; या ५ प्रकारच्या पांनामुळे दूर होईल कावीळ, लिव्हर होईल मजबूत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी