'भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी', शिवसेना आमदाराची टीका

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 10, 2020 | 14:46 IST

Shiv Sena harshly criticizes BJP:छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या गावातून हटवला गेला आहे, त्या मनगुत्ती गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला आहे. मनगुत्ती गावात अनेक वरिष्ठ अधिकारी येऊन बैठका करत आह

Shiv Sena harshly criticizes BJP
'भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी', शिवसेना आमदाराची टीका   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी- कैलास पाटील
  •  गावात मोठा पोलीस बंदोबस्त
  • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने

उस्मानाबाद: बेळगाव येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा हटवला (remove Statue) गेल्याने, राज्यभरात वातावरण तापले आहे. दरम्यान सदर घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने (osmanabad shivasena protest) देखील करण्यात आली आहेत. उस्मानाबाद येथे देखील शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (mla kailas patil) यांच्या नेतृत्वात आंदोलन केले गेले आहे. शिवसेनेने केलेल्या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे देखील मारले गेले असून, आमदार कैलास पाटील यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी- कैलास पाटील

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाना साधत म्हणाले की, कर्नाटकातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला आहे. भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे. भारतीय जनता पार्टीला फक्त मतदानाच्या वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. हे वेळीवेळी महाराष्ट्राने पाहिले आहे. भाजपच्या अशा प्रवृत्तीचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, भाजपने पुन्हा त्याच ठिकाणी पुतळा बसवावा, नाहीतर यापेक्षा देखील उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.

गावात मोठा पोलीस बंदोबस्त

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या गावातून हटवला गेला आहे, त्या मनगुत्ती गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला आहे. मनगुत्ती गावात अनेक वरिष्ठ अधिकारी येऊन बैठका करत आहेत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ५ ऑगस्ट रोजी बसवण्यात आला होता. दरम्यान पुतळा बसवण्यासाठी गावतील ग्रामपंचायत देखील परवानगी दिली होती. मात्र गावातील एका गटाचा विरोध होता. अशी देखील माहिती समोर येत आहे.

पुतळा त्वरित बसवण्याची मागणी

मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या नंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील महिला,तरुण संख्येने गावातील चौकात जमले आहेत. दरम्यान गावात पोलीस बैठक घेत आहेत. पुतळा त्वरित बसवावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी मनगुत्ती गावातील ग्रामस्थांची वतीने भूमिका आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने

दरम्यान सदर घटनेचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर देखील कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी घटनेचा निषेध करत आंदोलन केले आहे. कर्नाटक येथे असणाऱ्या भाजपा सरकरची तिरडी दहन करून, आंदोलन करण्यात आल आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे भाजपचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप, यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला आहे.

पुतळा हटवणे निंदनीय- विनायक मेटे

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप सोबत युती असलेल्या शिवसंग्राम पार्टीचे आमदार विनायक मेटे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणे हे निंदनीय असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान विनायक मेटे म्हणाले कि, कर्नाटक सरकार कोणाचेही असो,  त्याचा महाराष्ट्राबद्दल सीमा भागाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल त्यांची चांगली भावना नाही. अनेक वेळा अपमान करायचही धाडस केलं आहे.राज्यात कुठलेही सरकार असो त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. अस विनायक मेटे यांनी म्हंटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी