"तानाजी सावंताची काय लायकी", ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेना आक्रमक

Shiv Sena has become aggressive after Tanaji Sawant's criticism : शिवसेनेचे नेते विनायक राउत हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. “तानाजी सांवंत कोण आहेत आणि त्याची लायकी काय आहे? आयत्या बिळावर येऊन बसणारा हा सावंत आहेत. त्यामुळे तानाजी सावंतने शिवसेनेच्या भानगडीत पडू नये. शिवसेनेची ताकद शिंदे गटाला दिसेसच”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

Shiv Sena has become aggressive after Tanaji Sawant's criticism
"तानाजी सावंताची काय लायकी", 'या' नेत्याने केला पलटवार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
  • तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेनंतर विनायक राऊत आक्रमक
  • शिंदे गट ही कीड आहे ही कीड भाजपा पोसते आहे – विनायक राऊत

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम – परांडा – वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यावर शिवसेने सावंत यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी “तानाजी कोण आहेत? आणि तुझी लायकी तरी आहे का, आदित्य ठाकरेंवर बोलायची”, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यातील वाद वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अधिक वाचा : लोकसभेत महागाईवर चर्चा सुरू होताच, महिला MP नं लपवली बॅग

तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेनंतर नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?

तानाजी सावंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सावंत यांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते विनायक राउत हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. “तानाजी सावंत कोण आहेत आणि त्याची लायकी काय आहे? आयत्या बिळावर येऊन बसणारा हा सावंत आहेत. त्यामुळे तानाजी सावंतने शिवसेनेच्या भानगडीत पडू नये. शिवसेनेची ताकद शिंदे गटाला दिसेलच”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

अधिक वाचा ; होणार दूध का दूध और पानी का पानी; पोलिसांनी मागवला मूळ ऑडिओ

शिंदे गट ही कीड आहे ही कीड भाजपा पोसते आहे – विनायक राऊत

पुढे बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर देखील निशाणा साधला आहे. “शिंदे गट ही कीड आहे. ही कीड भाजपा पोसत असल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे. भाजपाच्या तालावर नाचणारे हे लोक आहेत. यांना स्वत:चा आवाज नाही राहिला आहे. असं विनायक राऊत म्हणाले.

अधिक वाचा  ;सोन्याच्या भावात पुन्हा वाढ...कमकुवत डॉलर आणि मंदीची भीती

 

नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. यावेळी पत्रकाराने तानाजी सावंत यांना प्रश्न विचारत म्हटलं की, पुण्यात आज एकनाथ शिंदे यांचेही कार्यक्रम आहेत. तर दुसरीकडे काही अंतरावरचं आदित्य ठाकरे पुण्यात कात्रज चौकात जिथे सभा घेणार असून, आदित्य ठाकरे यांचे सभेचे ठिकाण हे आपल्या कार्यालयापासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची होत असलेली सभा ही शक्तीप्रदर्शन आहे. यावर तानाजी सावंत यांनी उत्तर देताना म्हटलं की, “आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही”. आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी