औरंगाबाद : किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर असल्याची टीका औरंगाबाद शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. काल रात्री भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला असुन, सोमय्या यांना या हल्ल्यात थोडी दुखापत देखील झाली असल्याचं त्यांनी म्हटलं होते. यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांना ते शक्ती कपूर असल्याचं म्हटलं आहे.
अधिक वाचा : PM किसान योजनेत 8 मोठे बदल, लवकर करा हे काम नाहीतर...
काल दिवसभर झालेल्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यानंतर या दोघांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात येत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला. तसचं शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. सदर घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपच्या नेत्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
अधिक वाचा : बॅंक फ्रॉड झाल्यास पैसे परत कसे मिळवाल, पाहा नियम आणि पद्धत
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी यावेळी विकास कामांच्या श्रेयावरून अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली आहे. भागवत कराड हे अजून नवीन आहेत, त्यांना काय कळतं? अशी टीका खैरे यांनी केली आहे. तर, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, "किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तर त्यांना दहा ठिकाणी फिरायची गरज काय? असा सवाल उपस्थित करत सोमय्या यांना स्टंटबाजी करायची सवय असल्याची टीका खैरे यांनी केली.
अधिक वाचा : जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांनी केलंय सचिन तेंडुलकरचं